पाटोदा, दि. १ (लोकाशा न्युज) : श्री.क्षेत्र रामेश्वर येथे यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने धबधबा वाहत आहे. याचेच आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून पर्यटक गर्दी करीत आहेत. येथे श्री रामचंद्र यांचे देवस्थान असून कोरूना संकटामुळे मंदिर बंद आहे. तरीपण येथे रोज हजारो पर्यटक गर्दी करत आहेत. कोरणामुळे पर्यटकांना येण्यास अनेकांनी विरोध केला. प्रशासन यांना वारंवार माहिती दिली पण संबंधित प्रशासन यांनी दखल घेतली नाही. याचाच प्रत्यय आज आला असून धबधब्याचा आनंद घेण्यासाठी काही तरुण आले होते. यावेळी पाण्यात मस्ती करत असताना एक तरुण पाण्यात बुडला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. भागातील व्यवसायिक यांनी तात्काळ उडी घेऊन त्यास बाहेर काढले. यावेळी वन खात्याचे वनरक्षक भाऊसाहेब पेचे, नवनाथ उबाळे यांनी तात्काळ त्यास पाटोदा ग्रामीण रुग्णालय येथे हलवले आहे.