माजलगाव

पुन्हा छताचा पत्रा उचकुन मोंढयात चोरी,आठवड्यात तेरावी चोरी


माजलगाव, दि. 28 : शहरातील जुन्या मोंढयातील दुगड टेलीकाँम या दुकानाच्या छतावरील पत्रे उचकुन पीओपी फोडुन दुकानात चोरीची घटना घडली असुन आठवड्यात अशाप्रकारे चोरी होण्याची तेरावी घटना आहे.
मोंढयात भरवस्तीत गणपती मंदिरासमोर असलेल्या वैभव दुगड यांच्या मालकीची दुगड टेलीकाँम ही दुकान असुन शनिवारी संध्याकाळी 6 वाजता ही दुकान बंद करून गेल्यानंतर रविवारी सुट्टी असल्याने दुकान उघडली नाही व सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दुकान उघडले असता छतावरील पीओपी खाली पडलेला दिसुन आला व पत्रा कटकेलेला दिसुन आला.व गल्ला देखील उघडा दिसुन आला व यातील सहा हजार रुपये चोरी गेले.याबाबत शहर पोलिसांना कळवल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी घटनास्थळी भेट दिली.वैभव दुगड यांच्या फिर्यादीवरून वृद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे हे करत आहेत. माजलगाव शहरात अशा प्रकारच्या चोरीच्या मागील आठवड्यात 13 घटना घडल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!