माजलगाव

ग्राहक मंचचा दणका, माजलगावच्या यशवंत सर्जिकलला सात हजार रुपयांचा दंड !


दिंद्रुड, दि. 1 ऑक्टोबर : माजलगाव येथील यशवंत सरर्जिकल अ‍ॅन्ड ट्राम केअर सेंटरचे वैधकीय डॉ.यशवंत राजेभोसले यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग बीड समक्ष श्रीधर कि. कुलकर्णी, अध्यक्ष, श्रीमती अपर्णा दिक्षित, सदस्या, सदस्या श्रीमती मेघा गरूड यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वय सेवेत त्रुटी केल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून सात हजार रूपय देण्याचा आदेश दिला आहे.
सविस्तर वृत्त असे कि अविनाश दादाराव घायाळ (रा. देवदहीफळ ता. धारूर) येथील रहिवासी असून ते टायफडने आजारी झाल्यामुळे यशवंत सरर्जिकल अ‍ॅन्ड ट्राम केअर सेंटर हॉस्पीटल मध्ये दि. 15 मे 2019 ते 18 मे 2019 पर्यंत आंतररूग्ण म्हणून उपचार घेत होते. उपचार नंतर बरे झाले. दि. 18 मे 2019 रोजी सदर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. अविनाश घायाळ हयांनी स्टार हेल्थ प्लस विमा पॉलिसी घेतलेली होती. सदर पॉलिसीचा लाभ घेता यावा म्हणून ओरिजिनल डिस्चार्ज कार्ड, हॉस्पिटलचे इनडोअर पेपर व ओरिजिनल हॉस्पिटल बील, हॉस्पिटलच्या लायसन्सची झेरॉक्स कॉफीची मागणी केली होती. थोडे दिवस थांबा नंतर देतो असे वारंवार सांगून उडवाउडवीची उत्तरे देऊन मागणी प्रमाणे कागदपत्रे देण्यास नकार दिला. सदरील कागद पत्रे विमा कंपनीकडे एक महिन्याच्या आत दिली आसती तर त्यांना सदर विमा पॉलिसीचा लाभ घेता आला आसता पंरतु डॉक्टरांनी कागद पत्रे न दिल्यामुळे पॉलिसीचा लाभ घेता आला नाही. हॉस्पिटलचा खर्च रक्कम रू. 4000/देवून सुध्दा पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी कागद पत्रे नाकारून सेवेत त्रुटी केल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून दि. 06 जुलै 2019 रोजी अ‍ॅड. एस. आर. कुंभार वकिला मार्फत डॉ. यशवंत राजेभोसले यांना नोटीस पाठवली. तसेच अविनाश घायाळ यांनी निशाणी क्रं. 3/3 वरती मेडिकल बिल हॉस्पिटलचे रू. 4000 भरल्याची पावती अभिलेखावर दाखल केलेली आहे. रिपोर्ट व अ‍ॅडमिट कार्ड, व स्टार हेल्थ इन्शुरन्सची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे. स्टार प्लस मेडीक्लेम ह्या विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार मुदतीत हॉस्पिटल मध्ये आंतररूग्ण असल्यामुळे सदर कागद पत्रे न केल्यामुळे त्यांना सदर विमा पॉलिसीचा लाभ घेता आला नाही तक्रारदारास हॉस्पिटलचे मुळ बिल, डिस्चार्ज कार्ड व कागद पत्रे न देवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे जिल्हा मंचाने अविनाश घायाळ यांना रू. 4000/ व मानसिक, शारीरिक त्रासापोटी रू. 2000/व तक्रारारीचा खर्च रू. 1000/आसे एकुण रक्कम रू . 7000 / आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत अदा करावे. अन्यथा सदर रक्कमेवर द. सा. द. शे. 8 दराने द्यावे लागेल आसे आदेश डॉ. यशवंत प्र. राजेभोसले यांना देण्यात आले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!