क्राईम

शिवाजीनगर ठाण्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या त्या गुन्ह्यातील आरोपीला चार तासात ठोकल्या बेड्या

बीड, दि. 28 : दि.02-07-2021 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं .218 / 2021 भादंवि कलम 376,376 ( 2 ) , ( न ) , 307,313,323,504,506 सह बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6 सह अनुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2015 चे कलम 3 ( 1 ) , ( आर ) ( एस ) ( डब्ल्यू ) या अन्वये पिडीत महिलेचा जबाब महिला दक्षता समितीच्या समोर इन कॅमेरा नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्यांच्या तपासामध्ये पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पिडीत महिलेच्या फिर्यादी जबाबाप्रमाणे गुन्हा नोंदवून त्यास यथायोग्य सर्व कलमांचा समावेश सदर गुन्ह्यात करण्यात आला आहे . तसेच सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्हा दाखल झालेल्या वेळांपासून 04 तासांत आरोपी नामे पुरुषोत्तम ऊर्फ सोनू सुदाम मस्के रा.गुळज ता.गेवराई जि.बीड यास ताब्यात घेवून दि.03-07-2021 रोजी मध्यरात्री 02:19 वा.अटक करण्यात आली . त्यानंतर दि.03-07-2021 रोजी मा.न्यायालयासमोर आरोपीस हजर केले असता सदर आरोपीला मा . न्यायालयाने दि.05-07-2021 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.त्यानंतर – दि.05-07-2021 रोजी मा.न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे . सदर गुन्ह्यांचा तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक दर्जाचे अधिकारी , उपविभागीय अधिकारी , बीड हे करत असून पुढील तपास सुरु आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!