परळी

वैद्यनाथ कारखान्याच्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता,गुढी पाडव्यासाठी सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटप करणार – पंकजाताई मुंडे

परळी वैजनाथ दि. 4
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2020-21 ची आज (रविवारी) उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी सांगता संपन्न झाली. गुढी पाडव्याच्या सणासाठी सभासदांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटप करण्यात येणार असल्याचे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. दरम्यान ऐन महत्त्वाच्या सणासाठी पंकजाताई यांनी “गोड भेट” दिल्याबद्दल सभासदांनी पंकजाताई यांचे आभार व्यक्त केले आहेत.
कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यावर्षी यशस्वी गाळप केले आहे. या हंगामात कारखान्याने 2 ला 71 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कार्यक्षेत्र आणि कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे कारखान्याने गाळप केले. दरम्यान पंकजाताई मुंडे यांनी ऊस उत्पादकांचे हीत लक्षात घेऊन वैयक्तिक गुंतवणूक करून कारखाना यशस्वीपणे चालविल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
पंकजाताई मुंडे यांनी गळीत हंगाम यशस्वी केल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊसतोड मजूर, मुकादम यांचे अभिनंदन करून पुढील हंगामासाठीही असेच सहकार्य करावे असे आवाहन केले.

गुढी पाडव्यासाठी सवलतीच्या दरात साखर

   वैद्यनाथ कारखान्याने हंगाम यशस्वी केला आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला गुढी पाडवा सण जवळ आला असुन या सणासाठी वैद्यनाथच्या सभासदांना सवलतीच्या दरात साखर देण्यात येणार असल्याचे अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी जाहीर केले आहे.
 प्रति शेअर्स दहा किलो साखर देण्यात येणार असुन त्यासाठी प्रति किलो केवळ 25 रुपये दर आकारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. दि. 5 ते 10 एप्रिल या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित विभागाच्या कार्यालयात कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून साखरेचे वाटप केले जाणार आहे. 
  परळी विभागातील सभासदांना परळी विभागीय कार्यालय एन. एच. हालगे इंजिनिअरिंग काॅलेज, नाथरा विभागासाठी बालवाडी शाळा, केन अकौंटच्या बाजूला कारखाना साईट, पांगरी विभागासाठी पांगरी गट कार्यालय नंबर टेकच्या बाजूला कारखाना साईट, कासारवाडी विभागातील सभासदांसाठी सिरसाळा शेतकी कार्यालय, सिरसाळा, नागापूर विभागील सभासदांसाठी नागापुर शेतकी कार्यालय नागापुर, धर्मापुरी विभागासाठी धर्मापुरी शेतकी कार्यालय धर्मापुरी, घाटनांदुर विभागासाठी पुस शेतकी कार्यालय पुस याठिकाणी साखर मिळणार आहे. 
 सर्व सभासदांनी आपापल्या विभागीय कार्यालयातुन ठराविक वेळेत आणि काळात साखर घेऊन जावी असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे, उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांच्यासह सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

              ------

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!