परळी

परळीतील आणखी एका कामाच्या श्रेयासाठी पालकमंत्र्यांचा आटापिटा,पंकजाताई मुंडेंनी बस स्थानकासाठी मंजूर करून आणला होता निधी

परळी दि. ०९ —– भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सत्तेच्या काळात परळीसाठी आणलेल्या विविध कामांच्या निधीचे श्रेय घेण्याचा पालकमंत्र्यांचा आटापिटा अजूनही सुरूच आहे. परळी बसस्थानकासाठी पंकजाताई मुंडेंनी निधी मंजूर करून आणलेला असतांना त्याचेही श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केला आहे.

पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्री असताना परळीसाठी विविध कामांकरिता मोठया प्रमाणात निधी मंजूर करून आणला होता. वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास असो, शहरातील रस्ते असो की राष्ट्रीय महामार्ग हया
सर्वसाठी त्यांनी अतिशय तळमळीने प्रयत्न केले होते. परळी बसस्थानकाच्या नव्या इमारतीसाठी सुध्दा त्यांनी ५ कोटी ४५ लाखाचा निधी मंजूर करून आणला, त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते सप्टेंबर २०१९ मध्ये झाले होते, त्यानंतर आचारसंहिता लागली, पण प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली होती. आता या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच काम सुरू होणार आहे.

पालकमंत्री मात्र श्रेयासाठी पुढे !

विद्यमान पालकमंत्री सत्ता आल्यानंतर स्वतःच्या क्षमतेवर एक रूपयाचा देखील निधी सरकार कडून खेचून आणू शकले नाहीत. आता मतदारसंघात जी काही कामे सुरू आहेत, ती पंकजाताई मुंडे यांच्याच काळातील आहेत. पालकमंत्री मात्र आयत्या आलेल्या निधीवर डोळा ठेवून तो निधी आपणच आणल्याचे श्रेय घेत आहेत, परळी बसस्थानकाच्या कामाबाबतही त्यांनी अशाच आयत्या श्रेयाचा कित्ता गिरवला आहे अशी टिका लोहिया यांनी केली आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!