माजलगाव

तिर्रट नावाचा जुगार खेळताना 14 जणांना रंगेहाथ पकडले, पिंपळगाव शिवारात एसपींच्या पथकाची कारवाई, सव्वा चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त


माजलगाव, दि. 31 (लोकाशा न्यूज) : तिर्रट नावाचा जुगार खेळताना 14 जणांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव शिवारात केली आहे. यावेळी चार लाख 16 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत माजलगाव ग्रामीण ठाण्यात जुगार बंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश रामकिसन गोरे (वय 40 वर्षे रा.पिंपळगाव ता.माजलगाव), अलीमोदीन शिराजोदीन शेख (वय 55 वर्षे रा. सोमठाणा ता.माजलगाव), चुनूखॉ नुरखॉ पठाण (वय 50 वर्षे रा.पिंपळगाव ता.माजलगाव), कृष्णा शेषेराव कांबळे (वय 30 वर्षे रा.पाथरी जि.परभणी), नवनाथ हरीभाऊ लिंबोरे (वय 35 वर्षे रा.सोमठाणा ता.माजलगाव ), राजेश विश्‍वनाथ कांबळे (वय 50 रा. गौतमनगर ता.पाथरी), फेरोजखॉन फतेखॉन पठाण (वय 32 रा. सोमठाणा ता.माजलगाव), रूस्तूमखॉन दौलतखॉन (वय 55 रा. सोमठाणा ता.माजलगाव), प्रभाकर सखाराम जाधव (वय 50 वर्षे रा.चिंचोली ता.माजलगाव), डिंगाबर सिताराम मुळे (वय 55 वर्षे रा.रामपुरी ता.माजलगाव), सिद्धीखॉन लालखॉन पठाण (वय 61 वर्षे रा.सोमठाणा ता.माजलगाव), अंगद विष्णू शिंदे (वय 33 वर्षे रा. ढालेगाव ता.माजलगाव), विलास गणपराव सोळंके (वय 53 वर्षे रा. गंगामसला ता.माजलगाव) आणि प्रकाश बाबासाहेब शेजूळे (वय 55 वर्षे रा.आंबेगाव ता.माजलगाव) असे जुगार खेळताना पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. सदर ठिकाणी जुगार चालत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे यांना मिळाली होती, त्यानुसार सदर ठिकाणी 30 मार्च रोजी दुपारी साडे तीन वाजता हजारेंनी या जुगार अड्ड्यावर छापा मारला, यावेळी जुगार खेळताना चौदा जणांना पकडून त्यांना माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले, त्यानुसार जुगार बंदी कायद्यान्वये ग्रामीण ठाण्यात सदर जुगार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी जुगार्‍यांकडून 52200 रूपयांची नगद रोकड, मोबाईल (24000 रू.) आणि वाहणे असा एकूण चार लाख 16 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एपीआय हजारे यांनी केलेल्या या कारवाईमुळे जुगार्‍यांमध्ये चांगलीच भिती निर्माण झाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!