परळी

महाविकास आघाडीचा ‘काॅपी पेस्ट’ अर्थसंकल्प – भाजयुमोची टीका,परळी, बीडला दिलेल्या निधीचा आकडा पालकमंत्री सांगतील का?वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाची संकल्पना पंकजाताई मुंडे यांचीच..

परळी दि. ०९ – अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात बीड आणि परळीसाठी ‘भरीव निधी’ची तरतूद केली म्हणून ‘धन्यवाद अजित दादा’ च्या पोस्ट करणाऱ्या धनंजय मुंडेंनी खर तर पंकजाताईंचे आभार मानायला हवेत.राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परळी आणि बीड जिल्ह्यासाठी मंजूर केलेला विकास आराखडा अजित पवारांनी जशास तसा ‘कॉपी पेस्ट’ केला आहे, अशी टिका करत परळी, बीडला निधी देण्यावरून अभिनंदन करणारे पालकमंत्री या निधीचा आकडा सांगतील का? असा सवाल भाजयुमोने केला आहे.

तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत वैद्यनाथ देवस्थान मंदिराचा विकास करण्यासाठी जून २०१९ मध्ये सह्याद्री अतिथीगृहावर पंकजाताई मुंडे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार व संबंधित मंत्र्यांच्या पार पडलेल्या बैठकीत १३४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. या आराखड्या अंतर्गत वैद्यनाथ मंदिराच्या पुर्वेस हरीहर तीर्थाजवळ दर्शनी मंडप, प्रतिक्षागृह, धर्मशाळा, यात्री निवास, स्वच्छतालयाचे बांधकाम, मेरू पर्वताजवळ कॉटेजचे बांधकाम, मेरु पर्वतावर उद्यान विकसित करणे, मंदिराकडे जाणारे रस्ते विकसीत करणे, हरीहर तीर्थाजवळील उद्यान विकसीत करणे, मंदिर व इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करणे, हेलिपॅड, प्रदक्षिणा मार्ग विकसीत करणे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करणे, डोंगरतुकाई देवी पोच रस्त्याची कामे, या ठिकाणी उद्यान विकसीत करणे, काळ्या दगडाच्या दीपमाळ बांधणे अशी अनेक कामे आराखड्यातून करण्यात येणार होती.यासाठी २० कोटींचा निधी तात्काळ वितरित देखील करण्यात आला होता.

काल विधानसभेत अर्थसंकल्प जाहीर करताना अजित पवारांनी ढापाढापी केल्याचे आणि कॉपी पेस्ट केल्याचे दिसून येत आहे. वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासह जिल्हयातील विविध तीर्थक्षेत्र विकासाला निधी देऊ एवढेच नमुद केले आहे पण आकडा मात्र जाहीर केला नाही. तसेच बीडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग केवळ पूर्ण करू अशी घोषणा करताना अजित पवारांनी त्यासाठी आवश्यक असलेला निधीचा राज्याचा हिस्सा मात्र जाहीर केला नाही.महाविकास आघाडी सरकारकडून या रेल्वे प्रकल्पाला निधी मिळेल ही अपेक्षा देखील बीडच्या जनतेला नाही.केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समान भागीदारीने विकसित होत असलेल्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारचा जवळपास सर्वच निधी उपलब्ध झाला आहे.याचे सर्व श्रेय बीडच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे आहे.

राज्यात भाजपची सत्ता असताना या रेल्वे प्रकल्पासाठी भरीव निधी मिळाला,तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सततचा पाठपुराव्याने प्रकल्पासाठी अगदी वेळेवर निधी मिळत गेला.दुर्दैवाने राज्यात महाविकास आघाडीचे दळभद्री सरकार आले आणि निधीचा ओघ आटला.पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात केवळ निधीची तरतूद करण्यात आली ( फक्त तरतूद केली,निधी अजून मिळाला नाही) या तुलनेत भाजपची सत्ता असताना पंकजाताई मुंडे यांनी छप्पर फाड निधी आणला आणि ८६६ कोटींपेक्षा जास्त निधी मिळवून दिला होता. परळी, बीडला भरीव निधी दिल्यावरून अजित पवारांच्या अभिनंदनाच्या पोस्ट करणारे पालकमंत्री धनंजय मुंडे निधीचा आकडा जाहीर करण्याचे धाडस का करत नाहीत?असा सवाल करून एकंदरीत कालचा अर्थसंकल्प “आईजीच्या जीवावर बाईजी उदार ” असाच होता असे भाजयुमोचे प्रदेश सचिव ॲड अरुण पाठक, योगेश पांडकर, विजयकुमार खोसे, शाम गिते, नितीन मुंडे, बाळू फुले, वैजनाथ रेकणे यांनी म्हटले आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!