परळी

परळीत पंकजाताईंचा संघटनात्मक बांधणीवर भर, मतदारसंघात बुथ रचना समितीच्या बैठकांचे सत्र; मरगळ झटकून पुन्हा कामाला लागण्याचे कार्यकर्त्यांना केले आवाहन


परळी, दि. 4 (लोकाशा न्यूज) लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी अतिशय मेहनतीने हा मतदारसंघ उभा केला आहे, त्यांची मेहनत व्यर्थ जाता कामा नये, त्यासाठी मरगळ झटकून पुन्हा कामाला लागा असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. मतदारसंघात संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी त्यांनी बुथ रचना समितीच्या विविध बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सज्ज करण्यास सुरवात केली आहे.
पंकजाताई मुंडे आजपासून चार दिवस परळीत असणार आहेत. मतदारसंघातील बुथ रचना समितीच्या बैठकांमधून त्यांनी संघटना बांधणी करण्यावर भर दिला आहे. आज परळी ग्रामीणचे शक्ती केंद्रप्रमुख व प्रभारींची बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सरचिटणीस प्रा. देविदास नागरगोजे, समन्वयक शंकर देशमुख यावेळी उपस्थित होते.

लोकनेते मुंडे साहेबांनी मतदारसंघात संघटनात्मक ताकद मजबूत करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. सत्तेची दोन वेळा संधी सोडली तर आपण विरोधी बाकावरच जास्त काळ होतो,  सुरवातीपासून आपण पक्ष संघटनेवर भर दिला होता. आता पुन्हा एकदा तशीच सुरवात करायची आहे. त्यासाठी सर्वानी आतापासून कामाला लागण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने मतदारसंघातील प्रत्येक बुथ मजबुत असणे आवश्यक आहे. वन बुथ टेन युथ हया धोरणात पक्षाने बदल केला असून आता ’वन बुथ थर्टी युथ’ अशी बांधणी करायची आहे. बुथ रचना ऑनलाईन होणार असून त्यासाठी प देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. येत्या 6 एप्रिल रोजी भाजपा स्थापना दिनापासून गावोगांवी शाखा स्थापन उघडण्याचा संकल्प करत पुन्हा ताकदीने मैदानात उतरण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले. दरम्यान उद्या व परवा परळी शहर आणि अंबाजोगाई तालुक्यातील बुथ रचना समितीची स्वतंत्र बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  या बैठकीस भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, रमेश कराड, डॉ. शालिनी कराड, राजेश गिते, उत्तमराव माने, व्यंकटराव कराड, जि.प. सदस्य प्रदीप मुंडे, प.स. सदस्य भरत सोनवणे, मोहन आचार्य, वृक्षराज निर्मळ, बंडू निर्मळ, सुधाकर पौळ, बिभीषण फड, सुरेश माने, मुन्ना काळे आदींसह शक्ती केंद्रप्रमुख, प्रभारी उपस्थित होते. बैठकीचे संचलन चंद्रकांत देवकते यांनी केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!