बीड परळी

शांता राठोडला 5 कोटीचे आरोप भोवले; पुजाच्या वडीलांच्या तक्रारीवरून परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड,दि.3(लोकाशा न्यूज): केवळ आपल्या कुटुंबाची बदनामी करण्याचे कारस्थान शांता राठोड यांनी रचले आहे. शांता राठोड यांनी आपल्या कुटुंबीयांवर पाच कोटी घेतल्याचे केलेले आरोप चुकीचे व खोटे आहेत. त्यांच्याविरुद्ध कलम 500, 501, 502 भादंवि व कलम 66 (अ) माहिती व तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी तक्रारपूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून शांता राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, राठोड यांनी पाच कोटी रुपये दिल्याचा केलेला आरोपही लहू चव्हाण यांनी फेटाळून लावला आहे. तक्रारीत लहू चव्हाण म्हणाले की, काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी असे करत आहेत. माझ्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे. त्यामुळे मी स्वतः 28 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई होईल, असे सांगितले आहे. 1 मार्च रोजी शांता राठोड यांनी टीव्हीच्या माध्यमातून आमच्या मुलीशी काही संबंध नसताना स्वतःहून बदनामी करण्याच्या हेतूने खोटे आरोप केले आहेत.

मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. तसेच मला कोणी दडपण्याचा प्रयत्न केला नाही अथवा पैसे घेण्याचे कुणीही आमिष दाखवलेले नाही, याउलट मी माझ्या मुलीच्या दुःखात असतानासुद्धा मला बदनाम करण्याच्या दृष्टीने काही जणांनी प्रयत्न केले आहेत. शांता राठोड यांचा माझ्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही.- लहू चव्हाण,पूजा चव्हाणचे वडील

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!