परळी

वैद्यनाथ साखर कारखान्याने केले दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप, पंकजाताईंनी शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम, अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे केले अभिनंदन


परळी, दि. 26 (लोकाशा न्यूज) : पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि अनेक अडचणींवर मात करीत कारखान्याच्या अध्यक्षा, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ कारखाना चालू झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांचे हीत लक्षात घेऊन वैद्यनाथ कारखाना सुरू करण्यात आला असुन यामुळे शेतकर्‍यांची मोठी अडचण दुर झाली आहे. आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता. मात्र माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावर्षी कारखाना सुरू करून यशस्वीरित्या चालू केला आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 या गळीत हंगामात दिनांक 25 फेब्रुवारीपर्यंत 2 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असुन 1 लाख 75 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे तर सरासरी साखर उतारा 10. 44 टक्के असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान कारखान्याने गाळपाची यशस्वी परंपरा कायम राखल्याबद्दल कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे सर्व संचालक मंडळ यांनी ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम, कर्मचारी, अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!