परळी

भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाने मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व हरपले, पंकजाताई मुंडे यांची भावपूर्ण श्रध्दांजली

परळी । दिनांक २४ ।
माजी सनदी अधिकारी तथा परळीचे भूमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाने मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

मराठवाडयातील पहिले आयएएस अधिकारी, वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माझ्या परळी तालुक्याचे भूमिपुत्र गाढे पिंपळगाव येथील मुळ रहिवासी असलेले भुजंगराव कुलकर्णी यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. अतीव दुःख झाले, मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तीमत्व हरपले, त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!