विदर्भ

पूजा चव्हाण प्रकरणी एक पथक बीडला अन् दुसरे यवतमाळला रवाना !


बीड – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली असून तुन पथके तपासासाठी बीड,पुणे आणि यवतमाळ या ठिकाणी रवाना झाली आहेत,ही पथके बीड जिल्ह्यात पूजाच्या गावी तसेच यवतमाळ येथे जिल्हा रुग्णालयात तपासणी करणार आहेत .

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आता पुणे पोलिसांनी तपास मोहीम हाती घेतली आहे. पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना तपासाचे आदेश दिल्यानंतर पोलीसांकडून मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. वानवडी पोलिसांचं एक पथक सोमवारी यवतमाळमध्ये दाखल झालं आहे. पूजा चव्हाण हिने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती मिळतेय. त्याबाबत तपास करण्यासाठी हे पथक यवतमाळमध्ये पोहोचलं आहे. पूजा चव्हाण हिने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतले होते का? याबाबत पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्याचं एक पथक यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालं आहे. पुणे पोलिसांनी तशी नोंद यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात केली आहे. या तपासाबाबत पुणे पोलिसांनी रुग्णालय अधिष्ठातांना एक पत्रही लिहिलं आहे. त्यात पूजा चव्हाण हिने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतले होते का? उपचार घेतले असतील तर ते कुठल्या प्रकारचे उपचार होते? असे काही प्रश्न या पत्राद्वारे विचारण्यात आले आहेत. इतकच नाही तर पूजा चव्हाण हिने अजून कुठे उपचार घेतले होते का? याचाही तपास पुणे पोलीस करत आहेत. यवतमाळ जिल्हा रुग्णालयात 2 फेब्रुवारीला पूजा चव्हाण नाही तर पूजा अरुण राठोड या नावाने एका रुग्णाची नोंद असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळत आहे. त्यामुळे पूजा हिने नाव बदलून उपचार का घेतले? असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग विभागाचे प्रमुख नॉट रिचेबल असल्यानं या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत आहे.
error: Content is protected !!