देश विदेश

‘अफवांवर विश्वास ठेवू नका..’, कोरोना लशीबाबत पंतप्रधानांचं जनतेला आवाहन


नवी दिल्ली, दि. 16 जानेवारी : भारतासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण देशामध्ये आज तीन लाखहून जास्त आरोग्य कर्मचाख्यांना कोव्हिड-19 ची पहिली लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे याबाबत माहिती दिली. संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी लसीकरणाचे अभियान सुरू होणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण 3006 लसीकरण केंद्र बनवण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक संशोधनाशी संबंधित लोकांचे कौतुक केले. कमी वेळात मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवण्यात आल्याने त्यांनी हे गौरवौद्गार काढले आहेत. इतक्या दिवसांपासून ज्याची सर्वजण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो ते व्हॅक्सिन आज अखेरीस आलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. काही लसीकरण अभियानाबाबत त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पंतप्रधान असं म्हणाले की, ’आपल्या शास्त्रज्ञांना आणि विशेषज्ज्ञांना दोन्ही लशींबाबत खात्री पटल्यानंतरच, त्यांनी या लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशवासियांनी कोणताही प्रोपेगँडा, अफवा आणि खोट्या प्रचारापासून सावध राहिले पाहिजे.’ ते पुढे म्हणाले की, ’भारतातील व्हॅक्सिन शास्ज्ञज्ञ, आपली मेडिकल सिस्टम, भारताची संपूर्ण प्रक्रियेबाबत संपूर्ण जगात विश्वासार्हता आहे. आपण हा विश्वास आपल्या ट्रॅक रेकॉर्डमुळे मिळवला आहे.’ ’मी सगळ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की कोरोना लसीचे 2 डोस घेणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसर्‍या डोसमध्ये एका महिन्याचे अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यानंतर आपल्या शरीरात कोविड 19 विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे सुरू होईल’, असं मोदी यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!