मुंबई राजकारण

धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ : तक्रारदार महिलेचे सनसनाटी आरोप ; उद्या करणार मोठा पोलखोल

​मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेत पक्षानं त्यांना दिलासा दिला आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची गरज असून त्यानंतरच पक्ष मुंडेंवर कारवाई करेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. संबंधित महिलेवर काही इतर नेत्यांनी ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असं आज शरद पवार म्हणाले. त्यामुळे मुंडेंना काहीसा दिलासा मिळाला असताना आता तक्रारदार महिलेनं त्यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत.

​ ‘२००६ पासून चार-एक वर्ष सोडल्यास धनंजय मुंडेंनी माझा वापर केला. २०१३ पासून त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मला सांत्वना दाखवून, विश्वास देऊन केवळ माझा वापर करून घेतला. मला उद्ध्वस्त केलं. लग्नाचं वचन देऊन माझा वापर करून घेतला,’ असे खळबळजनक आरोप तक्रारदार महिलेनं वृत्तवाहिनीशी बोलताना केले. 

​ गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर अन्याय होत असताना गप्प का राहिलात, असा प्रश्न महिलेला विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ होते. ते व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवायचे. त्यामुळे मी गप्प होते. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा होती. मी अतिशय महत्त्वाकांक्षी होते. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. मी तुझ्या मागे गंभीरपणे उभा राहीन, असं आश्वासन देऊन त्यांनी माझा फक्त वापर केला, असा गंभीर आरोप महिलेनं केला.

​ भाजपचे नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे नेते मनिष धुरींनी केलेल्या आरोपांवरही तक्रारदार महिलेनं भाष्य केलं. ‘मी हेगडे यांचा आदर करायचे. आताही मला त्यांच्याबद्दल आदर आहे. आमची भेट प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाली. ते स्वत: पुढाकार घेऊन माझ्याशी बोलले. मुंडेंनी माझ्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत. त्यामुळेच आता हेगडेदेखील माझ्यावर आरोप करत असावेत. कदाचित ते मुंडेंचे मित्र असावेत,’ असं महिलेनं सांगितलं.

‘मनिष धुरी यांना मी एका कामासाठी भेटले होते. एकदा माझ्या व्हिडीओ अल्बमचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं. पण संबंधित कंपनी माझा व्हिडीओ अल्बम रिलीज करत नव्हती आणि मलाही देत नव्हती. तेव्हा मी धुरी यांच्याकडे मदत मागितली. ती अनेकदा मला फोन करायचे. तू कुठे राहतेस, कोणासोबत राहतेस याबद्दल त्यांनी विचारणा केली. त्यावेळी धनंजय मुंडे माझ्या बहिणीचे पती असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी धुरींनी मुंडेंबद्दल अपशब्द वापरले होते. पण आता तेच धुरी मुंडेंच्या बाजूनं बोलत आहेत,’ असं महिलेनं सांगितलं.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!