मुंबई

पांड्या बंधूंना धक्का, वडील हिमांशू पांड्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

टीम इंडियाचे ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्या वडिलांचं शनिवारी निधन झालं आहे. हिमांशू पांड्या (Himanshu Pandya) यांनी बडोद्यामध्ये अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा धक्का लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूमुळे कृणाल पांड्या बायो-बबलमधून बाहेर आला आहे. कृणाल पांड्या हा सध्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धा खेळत आहे. तो बडोद्याच्या टीमचा कर्णधार आहे. तर हार्दिक पांड्या ही स्पर्धा खेळत नाहीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी-20 सीरिज खेळून हार्दिक पांड्या घरी परतला.

हार्दिक आणि कृणाल यांच्या यशामध्ये हिमांशू पांड्या यांची भूमिका मोलाची राहिली. हिमांशू सुरतमध्ये छोटा कार फायनान्सचा व्यवसाय करायचे, पण मुलांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्यांनी बडोद्याला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. बडोद्यामध्ये सुरतपेक्षा क्रिकेटची चांगली सुविधा आहे, त्यामुळे हिमांशू यांनी आपला व्यवसायही बंद केला. मुलांना क्रिकेटपटू बनवण्याच्या निर्णयावर काही नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित केले होते, पण आम्ही विश्वास ठेवला, असं हिमांशू पांड्या एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!