माजलगाव

आ. सतीश चव्हाण यांनी गड राखला, मराठवाडा पदवीधर मतदार संघात तिसऱ्यांदा मिळवला दणदणीत विजय


औरंगाबाद, 4 डीसेंबर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केलं. पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. सतीश चव्हाण यांना एकूण 116638 मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत एकूण मतदान 2 लाख 41 हजार 908 इतके झाले. त्यापैकी तब्बल 23 हजार 92 इतकी मते अवैध ठरली. पदवीधर निवडणुकित मतदान करताना मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभ‌ळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे लागते. इतर कोणत्याही पेनचा वापर करता येत नाही.तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रमांक नोंदवावं, रकान्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवावे, असा नियम आहे.

उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत. तितके पसंतीक्रमांक नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंती क्रमांकाचा अंक नोंदवावा लागतो. तो पसंती क्रमांक इतर कोणत्यही उमेदवारासमोर नोंदवू नये अस नियम आहे. पसंतीक्रमांक हे केवळ 1,2,3, अशा अंकामध्ये नोंदवाव. एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांत नोंदवू नये असा नियम आहे . तरीदेखील उच्चशिक्षित 23 हजार पदवीधर उमेदवारांना मतदान करता आले नाही हे विशेष.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!