माजलगाव

माजलगावात मुकादमाचा खून, मोटारसायकल सापडली मात्र मृतदेहाचा शोध

सुरूमाजलगाव (लोकाशा न्यूज):-         तब्बल एक महिन्यापासुन बेपत्ता असलेल्या मुकादमाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील संशयीत आरोपीने खून केल्याची कबुली दिली असुन मयत व्यक्तीची मोटारसायकल गोदावरी नदीच्या किनार्‍यावर आढळली. मात्र मृतदेह अजुनही सापडलेला नाही.माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील मुकादम अंकुश भाऊराव राठोड (वय 45) हे मोटारसायकल क्र.एम.एच.23 ए.एल.9274 या गाडीवरून दि.01 नोव्हेंबर 2020 रोजी ऊसतोडणी कामासाठी कोयते बांधण्यासाठी व एका ड्रायव्हरला आणण्यासाठी वादुर फाटा (ता.परतुर जि.जालना) येथे गेले होते. ते पुन्हा परत आले नाही. याप्रकरणी शोध घेवुनही ते मिळुन न आल्याने माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दि.02 नोव्हेंबर रोजी मुकादम अंकुश राठोड हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. सदरील प्रकरणाचा तपास आष्टी पोलिसाकंडे देण्यात आला होता. यामध्ये पोलिसांनी तपास केला असता त्यांच्या नात्यातीलच  व्यक्तीला ताब्यात घेवुन त्याची चौकशी केली असता सदरील व्यक्तीने मुकादम अंकुश राठोड यांचा खून केल्याची कबुली देत मृतदेह सांगवी येथील गोदावरी नदी पात्रात फेकुन दिल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली असता त्यांना राठोड यांची मोटारसायकल आढळुन आली. मात्र अंकुश राठोड यांचा मृतदेह सापडला नसुन शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!