माजलगाव

राष्ट्रवादीत ‘मंजुर‘च्या उंबरठयावरचे कार्ड तबेल्याच्या वळचणीला; अध्यक्ष पदासाठी दोन्ही डगरीवर हात

जातीय समिकरणाच्या पातळीवर अध्यक्षपदावर दावा भविष्यातील डोकेदुखी


माजलगांव, दि.२८ (लोकाशा न्युज) : नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे तसे राजकिय हालचालिंना वेग येवु लागला असुन अध्यक्ष हा शासनाच्या नविन आदेशानुसार नगरसेवकांतुन निवडला जाणार असल्याने स्थानिक नेतृत्व मानल्या जाणा-या आ. प्रकाश सोळंके, मोहन जगताप, सहाल चाउस यांच्या गणित जुळवणीला वेग आला असला तरी राष्ट्रवादीतील ‘‘मंजुर‘‘ ीच्या उंबरठयावरचे कार्ड राष्ट्रवादीत आपल्या नावाला इतर नगरसेवकांकडुन होत असलेला विरोध पाहुन दोन्ही डगरीवर हात ठेवण्याच्या उददेशाने तबेल्याच्या वळचणीतुनही प्रयत्नशील असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
वरकरणी आ. प्रकाश सोळंके ठरवतील तोच नगराध्यक्ष होईल असे वाटत असले तरी नगरपालिकेच्या राजकिय फडात अंतर्गत हालचालींना चांगलाच वेग आला असुन आ. सोळंके यांच्याकडे असलेल्या दोन नगरसेवकांनी अध्यक्षपदावर दावा ठोकत कुरघोडीला सुरुवात केली आहे. त्यातील एक नगरसेवक निष्ठेच्या पातळीवर आपला षडडु गाडण्याच्या तयारीत आहे तर दुसरा हा जातीय समिकरणाच्या पातळीवर दावा करीत आहे. आ. सोळंके यांच्याकडुन निष्ठेला न्याय असल्याचे धोरण बाजार समितीच्या माध्यमातुन दिसले आहे तसेच पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीच्या वेळी देखील उपसभापती निवडतांना जातीय आधारावर पक्षात थारा नसल्याचे दाखवुन दिलेले आहे. पण माजलगांव शहरातील विशिष्ठ समाज माझयाच पाठीशी असल्याचा दावा करुन समाजाला न्याय देण्याची तसेच चाउस प्रकरणात दुरावलेला समाज जवळ आणन्याची संधी असल्याची दुहायी देवुन अध्यक्षपद मागत आहे पण तोच विशिष्ठ समाज या नगरसेवकाच्या पाठीशी किती आहे हे आ. सोळंके यांना चांगलेच ठावुक आहे. तसेच पक्षातील इतर नगरसेवक देखील मागील चार वर्षांचा कुरापाती इतिहास पाहता या नगरसेवकाच्या नावाने बोटमोडतात त्यामुळे अंतर्गत विरोधाचा सामना आ. सोळंके यांना करावा लागु शकतो या ठिकाणी आपला पत्ता कट होवु शकतो त्यामुळेच एव्हाना या नगरसेवकाने दुस-या डगरीवरुन अध्यक्षपदाला गवसणीचे प्रयत्न सुरु केले असुन चार वर्षात विस्तुही मधुन न जाणारी भुमिका निभावल्यानंतर अध्यक्षपदासाठी तबेल्याची वळचण धरल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडुन मिळत आहे त्यामुळे काळाची पाउले ओळखुन आ. सोळंके योग्य निर्णय घेतील असे राष्ट्रवादीतील आणि समर्थनातील नगरसेवक बोलु लागले आहेत तरीही सोळंके यांनी नगरसेवकांच्या लेखी नामंजुर कार्ड खेळलेच तर मतदान न करता तटस्थ भुमिका अवलंबीन्याची तयारी नगरसेवक करीत असल्याचे एका नगरसेवकाने नांव न छापण्याच्या अटीवर सांगीतले

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!