माजलगाव

माजलगावात कृषी सेवा केंद्राच्या मालकाने दुकानातच केली आत्महत्या


माजलगाव, दि. 20 (लोकाशा न्यूज) : शहरातील जुन्या मोंढा भागातील गोदावरी कृषी सेवा केंद्राचे मालक शेखर शरदराव सोळंके (35) याने शुक्रवारी  4 वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या वरील खोलीत आत्महत्या केल्याची घटना घडली.
  सादोळा येथील रहिवासी व माजलगाव शहरातील जुन्या मोंढयात मागील अनेक वर्षापासून खते, बी-बियाण्याचे दुकान मालक असलेल्या शेखर सोळंके यांनी सकाळपासुन आपला व्यवहार पाहुन अनेक दुकानदारांचे असलेले व्यवहार त्यांनी केल्यानंतर 4 वाजण्याच्या सुमारास दुकानच्या वरती असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेखर सोळंके यांचे येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा सादोळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई ,वडील ,भाऊ , पत्नी व दोन मुले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!