माजलगाव

तक्रार दाखल करायला गेलेल्या दोन गटात भर पोलीस ठाण्यात राडा

पोलीस कर्मचारी जखमी, ठाण्यातील साहित्याची नासधूस, परस्परविरोधी गुन्हे दाखल, हल्लेखोर दोन युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात


माजलगाव, दि. 22 : हॉटेलवर जेवण्याचे दोन हजार रुपये का मागितले म्हणून एका व्यक्तीवर आठ-नऊ लोकांनी हल्ला करून त्याला जखमी करून मोटर सायकलची नासधूस केल्याप्रकरणी आर्म एक्ट दाखल करण्यात आला आहे.तर घरी येऊन शिवीगाळ करणार्‍या विरुद्ध तक्रार दाखल करणार्‍या एका युवकावर चक्क पोलीस ठाण्यातच तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला.यातील एक घटना सोमवार दि 21 रोजी रात्री साडेआठ वाजता तर दूसरी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात घडली असून परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर हल्लेखोर दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संतोष ज्ञानबा गायकवाड,सोनाजी उत्तम गायकवाड व आकाश बबन जाधव यांनी सात-आठ लोकांना सोबत घेऊन योगेश ज्ञानदेव गायकवाड या युवकाला हॉटेलवर जेवणाचे दोन हजार रुपये तु का मागितले म्हणून चिंचगव्हाण येथील त्याच्या घरी त्याला मारहाण केली. ही घटना सोमवार दिनांक 21 रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. दरम्यान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संतोष उत्तम गायकवाड यांच्या चिंचगव्हाण येथील राहत्या घरी योगेश गायकवाड याने येऊन संतोष गायकवाड यास शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या संतोष गायकवाड यास चक्क पोलीस ठाण्यातच योगेश गायकवाडने आपला मित्र वैभव व्यवहारे कडून तलवार घेत डोक्यावर हल्ला केला. यावेळी योगेश यांनीही आपल्या त्यातील चाकू काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.यावेळी मध्यस्थी करणारे एक पोलिस कर्मचारीही जखमी झाले असून ठाणे आमदाराच्या केबिनची नासधुस झाली आहे. दरम्यान पोलिसांनी योगेश ज्ञानदेव गायकवाड यांच्या वरून संतोष गायकवाड सोनाजी उत्तम गायकवाड व आकाश बबन जाधव व इतर पाच ते सहा यांच्याविरुद्ध आर्मएक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर संतोष उत्तम गायकवाड याच्या फिर्यादीवरून योगेश गायकवाड,वैभव व्यवहारे यांचे विरुद्ध भा द वि 307 (34) आर्म एक्ट 353 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून दोन हल्लेखोर तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.जखमी युवकावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे हे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!