अंबाजोगाई

केंद्र सरकारकडून सोयाबीनला 3850 रूपये हमीभाव जाहिर

आता राज्य सरकारने खरेदी केंद्रे सुरू करावीत - राम कुलकर्णीअंबाजोगाई, दि. 4 : देशातील शेतकर्‍यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा खरीपाच्या पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत. सोयाबीन पिकाला 3850 रूपये भाव जाहीर केला. राज्य सरकारने आता महाराष्ट्रात सोयाबीन खरेदी केंद्रे तात्काळ सुरू केली तर कोरोना संकटात सोयाबीन उत्पादकांना चांगला भाव मिळेल अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. दरम्यान सोयाबीन खरेदीचे पैसे केंद्र सरकार देणार तर मग राज्य सरकारने खरेदी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभा करण्याची मागणीही केली आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने यंदा खरिपाच्या पिकासाठी हमीभाव जाहीर केले आहेत. त्यानुसार सोयाबीन पिकाला 3850 रूपये एवढा भाव जाहीर केला आहे. वास्तविक पाहता तूर, मुग कापूस आदी पिकाचे सुद्धा हमीभाव जाहीर केले. मात्र मागच्या वर्षी राज्य सरकारने उशिरा हरभरा खरेदी केंद्र चालू केल्यामुळे शेतकर्‍यांचा हरभरा खाजगी व्यापार्‍यांनी खरेदी केला. योग्य भाव शेतकर्‍यांना मिळालेला नाही. मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान शेतकर्‍यांचे झाले. ज्याचा फायदा ऑईल मिल चालकांनी घेतला. प्रत्येक वर्षी सोयाबीन बाजारात आल्यानंतर व्यापारी भाव पाडतात. ज्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसतो. जोपर्यंत शेतकर्‍यांच्या जवळ माल आहे. तोपर्यंत कमी भावाने खरेदी केली जाते. मात्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशातील शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेणारे नेतृत्व आहे. कोरोना सारख्या संकटात त्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफ.आर.पी वाढून दिली. विविध पिकांसाठी हमीभाव जाहीर केले. एवढेच नाही तर शेतकर्‍यांना त्यांचा माल देशात कुठेपण विकण्याची परवानगी देऊन टाकलेली आहे. एक देश एक बाजार याप्रमाणे केंद्र सरकारचे धोरण आणि नीती शेतकर्‍यांच्या हिताची जोपासना करणारी आहे. यंदा सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर चांगले आले असले, तरी अति पावसामुळे धोका पण, होऊ शकतो ? एकीकडे कोरोना संकट आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांना वेळेवर पीक कर्ज मिळालं नाही. 25 टक्के शेतकर्‍यांचे सोयाबीन उगवले नाही संकटात शेतकरी सापडलेला असताना,केंद्र सरकारने विविध पिकासाठी हमीभाव जाहीर केलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने संकटाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन खरेदी केंद्र, मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्यात तात्काळ चालू करावेत, अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे. सोयाबीन पीक हे तेलवर्गीय असून व्यापारी आणि सरकारची पॉलिसी अनेकदा शेतकर्‍यांच्या हिताची ठरत नाही. सोयाबीन खरेदी केंद्र सरकारने चालू केल्यास,चार हजार रूपये पेक्षा भाव जास्त मिळेल असेही कुलकर्णी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार खरेदीला पैसा देणार.? मग,राज्य सरकारने प्रभावी यंत्रणा सोयाबीन बाजारात येण्याअगोदर उभा करावी, अशी मागणी केली आहे. ही पार्श्वभूमीवर पाहता तात्काळ सोयाबीन खरेदी केंद्र राज्यात चालू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!