अंबाजोगाई

जोमात आलेले सोयाबीन पावसाअभावी गेले कोमात


घाटनांदुर : भारतीय कृषी व्यवस्था निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे मागील अनेक दिवसापासून पावसाने दांडी मारल्यामुळे जोमात आलेले सोयाबीन कोमात जात आहेत, म्हणजेच पाऊस नसल्यामुळे सुकू लागले आहे त्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि जिल्हाधिकार्‍यांनी सुकत असलेल्या सोयाबीनचे पंचनामे करण्याचे आदेश तत्काळ द्यावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत
मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे हाता तोंडाशी आलेले,उंच प्रमाणात वाढलेले,शेतकर्‍यांना उत्साहित करणारे,अपरिपक्व भरपूर शेंगा असणारे सोयाबीन ऐन शेंगा परिपक्व भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस पडत नसल्यामुळे अपरिपक्व शेगा आपोआप गळून पडत आहेत त्यामुळे शेतकर्‍यांना हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक सुकू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रचंड नैराश्य व उदासीन होत आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि जिल्हाधिकार्‍यांनी तत्काळ अंबाजोगाई तालुक्यातील तसेच परळी मतदार संघातील डोंगर भागातील सोयाबीनचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!