अंबाजोगाई

महावितरणचे कुचकामी धोरण, ग्राहकांना विनाकारण सोसावा लागतोय दंड

ग्राहकांना न्याय देण्यासाठी आ. नमिताताईंनी लातूरच्या मुख्य अभियंत्यांना दिले पत्रअंबाजोगाई : जनतेचा प्रश्‍न छोटा असो की मोठा, तो सोडविण्यासाठी आ. नमिताताई मुंदडा ह्या नेहमीच पुढे असतात, यावेळी त्यांनी महावितरणच्या कुचकामी धोरणाविरोधात आवाज उठविला आहे. महावितरणच्या अशा कुचकामी धोरणामुळे ग्राहकांना विनाकारण आणि नाहक दंड सोसावा लागत आहे. या ग्राहकांना न्याय देण्यासाठीच आ. मुंदडांनी 30 ऑगस्ट रोजी लातूरच्या मुख्य अभियंत्यांना पत्र दिले आहे.
अंबाजोगाई व इतर भागातील ग्राहकांना महावितरणकडून मासिक वीज बिल हे उशिरा मिळत आहेत. वीज बिल भरण्याच्या प्रथम तारखेनंतर, कधीकधी दुसर्‍या तारखेनंतर तर कधी वीज बिल भरण्याच्या शेवटच्या तारखेनंतर हे बिल ग्राहकांना मिळत असल्यामुळे ग्राहकांना 10 रूपये ते 50 रूपयांपर्यंतचा नाहक दंड बसत आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज बिल भरण्याच्या तारखे आगोदर बिले देण्यात यावी, अशी सूचना मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, लातूर यांच्याकडे आ. नमिताताईंनी पत्राद्वारे केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!