अंबाजोगाई

अंबाजोगाईत योगेश्वरी मंदिराच्या दारात भाजपाचा घंटानाद

ठाकरे सरकारने भाविक भक्तांचा अंत पाहू नये , युवा नेते अक्षय मुंदडाचा इशारा
अंबाजोगाई :
केद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचने नुसार महाराष्ट्र सरकार धार्मीक स्थळांचे बंद दारे उघडत नसून परिणाम मंदिरावर ज्यांच पोट भरत त्यांच्यावर उपास मारीची वेळ आहे ,ठाकरे सरकारने भाविकांचा अंत पाहू नये असा इशारा भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी दिला .
योगेश्वरी मंदिरा समोर भाजपाच्या घंटानाद आंदोलना ते बोलत होते . या वेळी बोलतांना मुंदडा यांनी ठाकरे सरकारवर टिका केली . मंदिरावर आधारित मोठी अर्थव्यवस्था असून सरकारने दारूचे आड्डे चालू केले , मग मंदिराला विरोध का ? असा सवाल त्यांनी केला , कोरोना संकटात अंबाजोगाई रुग्णालयात कोविड रुग्णांना साध जेवण चांगल मिळत नाही , रुग्णांची हेळसांड होते , बेड किती आहेत ?व्हेंन्टी लेटर तथा इतर साधन सुविधा नाही , एवढेच नाही तर कोविड योध्यांना हे सरकार पगार वेळेवर देत नाही यावर त्यांनी लक्ष वेधले ,ठाकरे सरकारने आमचा अंत न पाहता मंदिर खुले करावे आशी मागणी त्यांनी केली , कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष आच्युत बापू गंगणे यांनी केले , यावेळी भाजपाचे राज्य प्रवकते राम कुलकर्णी नगरसेवक डॉ . अतुल देशपांडे आदींची समयोचित भाषणे झाली भाजपाच्या नेत्या माजी मंत्री सौ पंकजाताई गोपीनाथ मुंडे खा. डॉ. सौ प्रीतम ताई मुंडे आ.सौ .नमिता ताई मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या घंटानाद आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आभार अॅड संतोष लोमटे यांनी मांडले . या कार्यक्रमाला सभापती मधूकर काचगुंडे , संचालक हिंदूलाल आबा काकडे , सारंग पुजारी ,दैवान मुंडे , डॉ ,पाचेगावकर नगरसेवक संजय गंभीर , सुरेश राव कराड , दयानंद मुंडे , संतोष शिनगारे , अमोल पवार ,ठाकुर सुजितसिंह दिख्खत , राहूल मोरे , प्रशांत आदनाक , व्यंकटेश चाम नर मुंडे सरपंच , विकासराव मुंडे ,हाणुमंत तौर गोकुळ कदम , माने सरपंच , बाळासाहेब पाथरकर , राहूल कापसे अनंतराव अडसुळे , आदीची उपस्थीती होती ,

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!