परळी

परळीतील सराफा दुकानांतील चोरी प्रकरणातील आरोपींच्या पुण्यातून मुसक्या आवळल्या


परळी : मागील दोन दिवसापूर्वीपरळी शहरातील अत्यंत गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील अरुण टाक आणि सराफा ह्या सोने-चांदीच्या दुकानी सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांनी डल्ला मारून दोन लाखांचे सोने लंपास केल्याची घटना घडली होती. ह्या घटनेने सोने-चांदी व्यापार्‍यांसह शहरात खळबळ माजली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद होता. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र ह्या धाडसी चोरीचा पर्दाफाश करण्यास परळी पोलिसांना यश आले असून पोलिसांनी पुण्यातून एका कारसह महिला आणि तीन आरोपींच्या मुस्क्या आवळीत जेरबंद केले आहे. परळी पोलिसांचे तपासातील हे मोठं यश आहे.
राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात अरुण टाक यांचे गेली अनेक वर्षांपासूनचे जुने अरुण टाक अँड सराफा नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. या दुकानी भरदिवसा म्हणजे अंदाजे बारा ते साडेबारा दरम्यान काही अज्ञात महिला तोंडास स्कार्फ बांधून ह्या दुकानी सोने खरेदीच्या बहाण्याने आल्या आणि त्यांनी दुकानातील नौकरांना गंठण दाखवण्याची मागणी केली. बघता बघता डोळ्यात धूळ फेकत दोन गंठण व एक नथनीचा सेट हातचलाखी करून लांबवले. परळी शहरात सलग दोन दिवस बाजारपेठेत चोरीचे प्रकार घडले. खळबळ उडवणारा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद होता. दरम्यान याप्रकरणी परळी पोलिसांनी् पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी आपल्या सहकार्‍यांसह तपासाची चक्रे वेगाने फिरवत पुण्यातून तीन जणांच्या मुसक्या आवळून जेरबंद केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पुण्यातून एक मारुती कार, दोन पुरुष व एक महिला यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास परळी पोलीस करत असुन चोरी करणारी मोठी टोळी उघड होण्याची शक्यता असुन विविध चोरीच्या घटनांमध्येही या टोळीचा हात आहे का हेही स्पष्ट होणार आहे. ह्या यशामुळे परळी शहर पोलिसांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!