परळी

गुंडाकडुन अल्पवयीन मुलींच्या घरावर दगडफेक करत छेड; सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

 परळी दि‌ २७ ( लोकाशा न्युज ):- शहरातील खंडोबा नगर भागात किरायाने रहाणार्या अल्पवयीन दोन मुलींची मागील दोन वर्षांपासुन काही गुंडाकडुन छेड काढण्यात येत होती. घरात  बेसहारा महिला व मुली असल्याचा गैरफायदा घेत मध्यरात्री या गुंडांनी मुलीच्या घरावर दगडफेक करत घरातील आई व आजीस धमकी देत अश्लील भाषेत शिविगाळ करुन छेड काढल्या प्रकरणी संतोष इंदरकरसह सहा जणांविरुध्द संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     परळी शहरातील खंडोबानगर भागात डांगे यांच्या वाड्यामध्ये एक महिला आपल्या आई व दोन मुलीसह किरायाने राहते. मागील दोन वर्षांपासुन दत्ता रामभाऊ त्रुप व प्रितम रोहिदास बनसोडे हे त्यांच्या मुलीची सतत छेड काढतात परंतु घरात कुणी पुरुष व्यक्ती नसल्याने व छेड काढणारे गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्या मुलीस तिची आई व आजी समजावुन सांगुन निघुन  जा असे सांगत असत. या गुंड प्रवृत्तीच्या काही युवकांची गणेशपार, गोपाल चित्र मंदिर परिसरात दहशत गुंडगिरी असुन या भागातील शाळा परिसरात दारु पिऊन मुलींची छेड काढणे, सावतामाळी मंदिर, सिध्देश्वर नगर, गणेशपार भागात मध्यरात्री दारु पिऊन धिंगाणा घालने यामुळे त्यांच्या तक्रारी पोलिस ठाण्यापर्य॔त जात नसत. दि. २५ ऑगस्ट मध्यरात्री प्रितम रोहिदास बनसोडे, संतोष बाबुराव इंदरकर, दत्ता रामभाऊ त्रुप, लक्ष्मण सोपान फाकटे, रामेश्वर साहेबराव गरड, गजानन लासे हे सहा जण खंडोबा नगर येथील डांगे यांच्या वाड्या समोर येवुन फिर्यादी मुलगी,तिच्या बहिणीस अश्लील भाषेत शेरेबाजी करुन घरावर दगडफेक केली असता मुलीच्या आईने घराचे दार उघडुन बघितले तर वरील सहा जणांनी बळजबरीने घरात प्रवेश केला आजी व आईस मारहाण करत दोन्ही मुलींशी लगट करुन छेड काढु लागले. हा प्रकार पाहून घरातील महिला मुलींनी आरडा ओरड केल्याने ते सहा जण घराबाहेर गेले. यावेळी त्यांनी अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान याप्रकरणी १७ वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरुन वरील सहा जणांविरुध्द कलम ३५४ (ए) (डी),३३६, ३२३, १४३,१४९, ५०४, ५०६, १८८, बाललैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम ८, १२, आपत्ती व्यवस्थापन ५१(बी), कोव्हीड- १९ अधिनियमनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!