धारूर

जन्मठेप लागलेल्या फरार आरोपीला धारूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या,ठाणेदार वाघमोडे यांच्या टीमने केली कारवाई


धारूर, पोलीस स्टेशन धारूर येथे दीड वर्षापासून प्रलंबित गु. र. नं. 48/2022 कलम 224 भा.द.वी. मधील पाहिजे असलेला आरोपी नामे निलेश लक्ष्मीकांत व्यास राहणार तेर जिल्हा धाराशिव यास धाराशिव येथून अटक करण्यात आली असून आरोपी यास जन्मठेपेची शिक्षा लागली आहे तो कोरोना कालावधीत कारागृहातून रजेवर आला होता व त्यानंतर तो फरार झाला सुमारे दीड वर्षेपर्यंत तो पोलिसांची नजर चुकवून फरार होता त्यास तांत्रिक तपास करून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेसाठी धारूर पोलीस मागील एक महिन्यापासून त्याच्या पाळतीवर होते परंतु तो हाती लागत नव्हता काल तो पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला असून त्यास न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री नंदकुमार ठाकूर सर, अपर पोलीस अधीक्षक आंबेजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी. वाघमोडे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत मस्के, मोरे यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!