बीड

सत्यमेव जयते म्हणत, अखेर पाली येथील शाळेत ‘त्या’ सर्व विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मिळऊन दिला प्रवेश, तुम्ही शिकायचं, शाळेत जायचं, मोठ होऊन असं माझ्या सारखं लोकसेवक होयचं,पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

बीड, दी. ५ : तीन जुलै रोजी जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शाळा, पाली, ता. जि. बीड येथील या शाळेमध्ये इन्फंट इंडिया या संस्थेत एचआयव्ही पीडित अनाथ आणि ऊसतोड कामगारांची शाळाबाह्य मुलं-मुली शिक्षणासाठी जात असतात. बीड येथील इन्फंट इंडिया या संस्थेत विविध मुले-मुली संगोपनासाठी असून त्यांचे उपचार व पालकत्व गेल्या २० वर्षापासून संस्थेने घेतले आहे. मागील अनेक वर्षापासून याच शाळेमध्ये शिक्षण मिळत आहे मात्र तीन जुलै राेजी येथील शाळेला कुलूप ठाेकले गेले अन‌् इन्फंट इंडियाच्या मुला-मुलींना बाहेर काढण्यात आले. दरम्यान इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे व अन्य सहकाऱ्यांनी प्रकरणाची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व अन्य अधिकाऱ्यांना दिली मात्र तात्काळ काहीच निर्णय झाला नाही. मंगळवारी (दि. ४) पाली येथून स्कुल बसमध्ये बसून विद्यार्थी पाली येथील शाळेत प्रवेश मिळत नसल्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. एका ठिकाणी बस थांबवली अन‌् जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमाेरील परिसरामध्ये शाळा भरवली. त्यानुसार सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांचे राष्ट्रगीत सुरू झाले. काही क्षणाचा विलंब न करता फेसबुक लाईव्ह झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात इन्फंट इंडियाच्या विद्यार्थ्यांचा वर्ग राष्ट्रगीतानंतर सुरू झाला. एका भिंतीला फळा ठेवण्यात आला. इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे यांनी वर्ग सुरू केला. जिल्हाधिकारी दीपा मुधाेळ-मुंडे हे कार्यालयात येतील आणि आमचा प्रश्न सुटेल या अपेक्षेने थांबलेले इन्फंट इंडियाचे विद्यार्थी व अन्य सहकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिक्षेत हाेते. काही वेळात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांचे वाहन कार्यालय परिसरात दाखल झाले. त्यांनी वाहनातून उतरताच संवाद सुरू केला. शाळा बंद केली. मुलांना बाहेर काढले हे कालच का कळवले नाही. आम्ही अनेकांचे कामे करताे, या विद्यार्थ्यांसाठी शाळा कालच खुली केली असती. काेणतीही कल्पना न देता असे शाळा भरवणे याेग्य नाही. संवेदनशील बाब आहे. पुढे असे करु नये असे सांगितले. दरम्यान अन्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले हाेते. त्यांना जिल्हाधिकारी कड्क शब्दात सूचना केल्या, शिक्षणाधिकारी यांना बाेलवून घ्या, जिल्हा परिषदेचे सीईओंना फाेन जाेडून द्या, पाली येथीलच शाळा खुली केली जाईल, तुम्ही इथेच थांबा असे म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ अजीत पवार यांच्यासमवेत संवाद साधला, पाली येथील प्रकरणासंबंधीत अधिकाऱ्यांची सुनावणी घ्या, त्यांच्यावर कारवाई करा तसेच असे प्रकार घडू नये म्हणून थेट गुन्हे दाखल करण्याची गंभीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात त्या विद्यार्थ्यांसह इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे यांना कार्यालयात बाेलावून घेतले. मुलांकडून शाळेतील ‘ती’ घटना समजून घेत अस पुन्हा होणार नाही, तुम्ही शिकायचं, शाळेत जायचं, मोठ होऊन असं माझ्या सारखं लोकसेवक होयचं…अस म्हणत प्रत्येक मुलांच्या वहीवर शुभेच्छा आणि स्वाक्षऱ्या केल्या,प्रत्येक मुलाला शेकहँड केला… जिल्हाधिकारी दीपा मुधाेळ-मुंडे या कर्तव्यदक्ष आहेत तसेच इन्फंट इंडियाच्या त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तीन तासामध्ये शाळा पुर्ववत खुली करुन संवेदनशीलपणे प्रकरण हातळत विद्यार्थ्यांना प्राेत्साहन दिले… तसेच म्हणाल्या की सत्यमेव जयते…त्यानंतर बुधवारी ( दि. ५) पाली येथील जिल्हा परिषदची शाळा खुली झाली. सर्व विद्यार्थी ज्ञानदान मिळवण्यासाठी हक्काने दाखल झाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!