बीड

अखेर माॅंसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट बुडाली;150 कोटी घेऊन बबन शिंदे फरार, माॅंसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या सर्व संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बीड : लोकांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून माॅंसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटने ठेवीदारांकडून कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करुन घेतल्या होत्या. बबन शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केली, यानंतर इतर ठिकाणी काही पैसा यातला खर्च केला यासह विविध ठिकाणी हा वापरण्यात आला. ज्यावेळेस ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींच्या मुदती संपल्या त्यावेळेस ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा देण्यास पैसेच नव्हते. यामुळे गेल्या काही महिन्यापासून ठेवीदारांना आज पैसे देतो, उद्या पैसे देतो असे बँकेकडून सांगण्यात येत होते, परंतु तारीख पे तारीख मिळत असल्यामुळे अखेर ठेवीदारांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये माॅंसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे, बबन शिंदे, मनीष शिंदे, योगेश करंडे, अश्विनी सुनील वांढरे व बँकेचे सर्व कार्यकारी मंडळावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद केल्यानंतर मात्र ठेवीदारांचे पैसे आता कशाप्रकारे मिळणार व कधी मिळणार हा प्रश्न मात्र आता ठेवीदारांना भेडसावत आहे.

येथील काही संस्था, मल्टीस्टेट व काही बँकांनी ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत. यामुळे दिवसेंदिवस पतसंस्था, मल्टीस्टेट, बँकांवरील विश्वास कमी होत चालला आहे. त्यातच बीड शहरातील व जिल्ह्यामध्ये अनेक शाखा असणारी माॅंसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट ने मात्र कोट्याधी रुपये ठेवीच्या स्वरूपात घेऊन ते पैसे इतर ठिकाणी खर्च केले. यामुळे ठेवीदारांचे पैसे परत देण्यास त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून या बँकेंकडून ठेवीदारांना पैसे देण्यास टाळाटाळ होत होती. अखेर सोमवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित फिर्यादीच्या तक्रारीवरून माॅंसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या सर्व कार्यकारिणीवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या फिर्यादीमध्ये फिर्यादीने म्हटले आहे की बँकेचे बबन शिंदे हे दीडशे कोटी रुपयांची ठेवी घेऊन फरार झाले आहेत. यासह त्यांनी बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवी गैरमार्गाने वापरत स्वतःच्या स्वार्थासाठी हा पैसा खर्च केला आहे. यामुळे ठेवीदारांना पैसे देण्यास बँक असमर्थ झाली असून माॅंसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट दिवाळखोरीत निघाली आहे. सर्वसामान्यांनी आपला पैसा सुरक्षित राहावा, यामुळे या ठिकाणी ठेवला होता. परंतु येथील कार्यकारणीच्या मनमानीमुळे मात्र कोट्याधी रुपयांचा अपहार झाला असून याप्रकरणी अॅंड संतोष जगताप यांच्या फिर्यादीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सदर बँकेचे अध्यक्षा अनिता बबन शिंदे यांचे पती बबन विश्वनाथ शिंदे तसेच त्यांचा मुलगा मनिश बबन शिंदे यांनी मला व माझ्या कुटुंबीयांना वारंवार भेटून जास्त व्याजदराचे आमीश दाखवून अपसात संगनमत करून कट रचून पैसे बबन शिंदे यांनी पैसे त्यांच्या पत्नीचे जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट मध्ये ठेवण्याचे वारंवार सांगितले. तसेच त्यांचे चिरंजीव मनिष बबन शिंदे व जावाई योगेश करांडे यांनी त्यांचे जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट बैंक मध्ये जास्त म्हणजेच वार्षीक 13 टक्के दराने व्याजदराचे आमिष देऊन पैसे टाकण्यास सांगितले. आम्ही वारंवार नाही म्हणालो असतांना त्यांनी वारंवार आम्हास घरी येऊन, बाहेर रस्त्यावर भेटून आम्हास अमिश दाखवून आमचे मत परिवर्तन करून आमच्या बँकेत पैसे भारा असे सांगितल्याने आम्ही त्यांच्या कट कारस्थानात बळी पडून आम्ही पैसे बँकेत भरले अध्यक्षांचे पती बबन विश्वनाथ शिंदे यांनी सदर अपहार केलेली रक्कम त्यांचे शैक्षणिक संस्थेस मेडीकल कॉलेज आणण्यासाठी दिल्ली येथे दिल्याचे सांगतात. तसेच बबन शिंदे यांनी अपहाराची रक्कम पुणे जिल्ह्याच्या परिसरात 40 एकर जमिन 2 फ्लॅट, तसेच औरंगाबाद व दिल्ली येथे प्रॉपर्टी मध्ये गुंतविल्याचे ऐकण्यात येते आणि बीड येथील प्रॉपर्टी पांगरी रोडवर 20 एकर जमिन तसेच त्या जागेवर त्यांची शैक्षणिक संस्था आहे. ती 17 एकर जागा सुध्दा सदरील इसमाने बाजार भावा पेक्षा कमी भावा मध्ये रजिस्ट्री करून ट्रान्स्फर करून ठेवल्या आहेत. त्यांनी स्वतः च्या मालकीच्या कार, संस्थेच्या गाड्या ट्रान्सफर करून ठेवल्या आहेत. तसेच तेथील दोन संस्था 100% Grant असलेले व दोन कॉलेज विकून टाकण्याच्या बेतात आहेत. तसेच अध्यक्षा अनिता बबन शिंदे, पती बबन शिंदे, मनिष शिंदे हे सर्व त्यांच्या शैक्षणिक संस्थेतील साहित्य, बेंच, फर्निचर सुध्दा त्यांनी विकले आहे तसेच विकत आहेत. तसेच ज्या राजीव गांधी चौकात त्यांची बँकेची इमारत व राहते घर आहे. त्या इमारतीवर पिरॅमल फायन्यानस कंपनी या बँकेचे 1.50 कोटी रुपये बोजा असतांना त्यांनी त्या इमारती मधील दुसरा मजला विक्री केलेली आहे. व उर्वरीत इमारत व घर विकण्याच्या बेतात आहे. ह्या सर्व प्रॉपर्टी विकून ते सर्व पळून जाण्याच्या बेतात आहे.

तसेच अनिता बबन शिंदे यांची जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट जी ज्या जागेत आहे ती त्यांचे पती बबन शिंदे त्यांच्या नावावर रजिस्ट्रर्ड आहे, तसे असतांना बोगस कागदपत्र तयार करून कुठलाही कागदपत्रे नस्तांना सदर महिलेचा मुलगा मनिष बबन शिंदे यास सदर जागेचा दरमहा 1,50,000/- (अक्षरी एक लक्ष पन्नास हजार रुपये) किराया देऊन ग्राहकांच्या पैशांचे संगणमत करून अपहार केलेला आहे..

मला असे समजते की, सदर बँकेत बीड जिल्ह्यातील लोकांचे अंदाजे 1,50,00,00,000/- (अक्षरी एकशे पन्नास कोटी रुपये) ठेवी आहेत. सदर कोणाच्याही ठेवी ते परत करत नाहीत. सदर बँकेचे अध्यक्षांचे पती श्री बबनराव हे सर्व बँकेतील पैसे घेऊन दिल्ली येथे पळून गेले असल्याची फिर्याद वकिल संतोष जगताप यांनी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!