बीड

नीटच्या परिक्षेत ‘आदित्य’चा डंका, 625 गुण प्राप्त करून बीडच्या आदित्य जाधवने मिळविले अलौकिक यश


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : नीटच्या परिक्षेत बीडमधील आदित्य जाधवचा डंका पहायला मिळत आहे. त्याने नीटमध्ये 720 पैकी 625 गुण प्राप्त करून अलौकिक यश संपादन केले आहे. याबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
बीडच्या आदित्य नगरीतील कै. सदाशिव काशिनाथ जाधव (शिक्षक, आदर्श शिक्षण संस्था) यांचे नातू व शिक्षीका सौ. शारदा संतोष जाधव यांचा मुलगा आदित्य संतोष जाधव हा अभ्यासात अत्यंत हुशार आहे. मनामध्ये असलेली जिद्द आणि चिकाटी कोणत्याही परिक्षेत सहजपणे यश मिळवून देते हे आदित्यने नेहमीच सिध्द करून दाखविलेले आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या नीट परिक्षेच्या निकालात त्याने अलौकिक आणि घवघवीत असे यश संपादन केले आहे. या नीट परिक्षेत 720 पैकी 625 गुण प्राप्त करून त्याने एमबीबीएस वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी आपला प्रवेश निश्‍चित केला आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडच्या चंपावती विद्यालयात झालेले आहे. तर त्याने लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना नीटची परिक्षा दिली, आणि या परिक्षेत त्याने आपले कर्तृत्व खर्‍या अर्थाने सिध्द करून दाखविले आहे. या घवघवीत यशाबद्दल विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद, सर्व नातेवाईक, आदित्य नगरीमधील नागरीकांनी त्याच्या अलौकीक यशाबद्दल कौतुक करून पुढील शिक्षणासाठी अभिनंदन केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!