Uncategorized

अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी आ. सोळंके पतिपत्नीसह टवाणी यांच्यावर गुन्हा दाखल, भ्रष्टाचाराचे प्रकरण न्यायालयात दाखल केले म्हणून हल्ला घडविल्याचा आरोप


माजलगाव : लोकाशा न्युज
सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप नेते अशोक शेजुळ यांच्यावर
मंगळवार दि. 7 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोटार सायकल वरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी शहरातील शाहू नगर मध्ये असलेल्या शिक्षक पतपेढी जवळ अडवून रॉडणे जबर मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा अशोक शेजुळ यांच्या फिर्यादीवरून आ. प्रकाश सोळंके, पत्नी मंगल प्रकाश सोळंके, उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सात जनावर कलम ३०७, १२० ब नुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवार धुलीवंदनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते अशोक शेजुळ हे आंबेडकर चौकात पान खाण्यासाठी केले असता तिथून परत येत असताना सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास शाहू नगर येथील मोरेश्वर विद्यालय जवळ पाठलाग करत असलेल्या सहा हल्लेखोरांनी त्यांना अडवले व अचानक त्यांनी रॉडने अशोक शेजुळ यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला यावेळी तेथे असलेल्या नागरिकांनी धाव घेतली असता हल्लेखोरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. या हल्ल्यात अशोक शेजुळ हे गंभीरित्या जखमी झाले त्यामुळे त्यांना येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल केले आहे. शेजुळ हे अत्यंत गंभीर जखमी असून त्यांचे डाव्या पायाला तीन फ्रॅक्चर, उजव्या पायाला एक फ्रॅक्चर तर दोन्ही हात ही फ्रॅक्चर असून डोक्याला ही जबर मार आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या सूतगिरणी मध्ये झालेल्या घोटाळ्या संदर्भात याचिका दाखल केल्याच्या प्रकरणातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप अशोक शेजुळ यांनी केला असून याप्रकरणी
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आ. प्रकाश सोळंके, पत्नी सौ.मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह अज्ञात पाच ते सहा जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कलम ३०७, १२० ब नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!