Uncategorized

जीवनात नवनाथाचा तर राजकाराणात गोपीनाथांचा आशीर्वाद मिळाला – देवेंद्र फडणवीस,वै.संत वामनभाऊंच्या 47 व्या पुण्यतिथी सोहळ्याला गहिनीनाथ गडावर भक्तांचा महापूर,मुंडे भगिनींच्या अनुपस्थितीने कार्यक्रमात निरूत्साह

पाटोदा : संजय सानप

‘महाराष्ट्र हे संतांची आणि वीरांची भूमी आहे; संत वामनभाऊ महाराजांनी आयुष्यभर समता आणि बंधुत्वाचा विचार दिला.. म्हणूनच इथे भक्तांचा महापूर दिसतो आहे! असे सांगत गहिनीनाथ गड हे मराठवाड्यातील पंढरी आहे, असा गौरव करत माझ्या जीवनात नवनाथाचा; तर राजकारणात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा आशीर्वाद मिळालेला आहे!’ असे जाहीर मनोगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

थोर राष्ट्र संत वामनभाऊ महाराजांचा 47 वा पुण्यतिथी सोहळा श्रीक्षेत्र गहीनाथ गड येथे आज रविवारी संपन्न झाला. या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमतः वामन भाऊंच्या समाधीचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. त्यानंतर पवित्र व्यासपीठावर त्यांनी विनम्रपणे आणि आशीर्वाद घेत भाषण केले. यावेळी व्यासपीठावर महंत विठ्ठल महाराज, आ.बाळासाहेब आजबे,आमदार लक्ष्मण पवार, आमदार सुरेश धस,मा.मंत्री जयदत्त माजी आमदार साहेबराव दरेकर,अक्षय मुंदडा,मोनिकाताई राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे, अजय दादा धोंडे, राजेंद्र मस्के, कुंडलिक खांडे आदी सह मान्यवरांची उपस्थिती होती.

पवित्र मंचावर लाखो संत वामन भाऊंच्या भक्तांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, इथे अक्षरशः भक्तांचा महापूर पाहायला मिळाला आहे..
मराठवाड्यातील गहिनीनाथगड साक्षात पंढरी आहे.
राजकारणावर अप्रत्यक्ष बोलताना ते म्हणाले, ईश्वरराच्या मनात आल्याशिवाय संधी मिळत नाही, वामनभाऊ महाराज यांनी मला आजच बोलावले होते, म्हणुन आज दर्शनाचा योग आला, मी माझे भाग्य समजतो,असे ते विनम्र पणे सांगत संत वामन भाऊंच्या चरणी नतमस्तक झाले.

‘देव,देश,धर्म हा वारकरी संप्रदायामुळे वाचला आहे.
संस्कार, संस्कृती, वारकरी ही समाजाची उपलब्धी आहे.
कोरोनाकाळात गहिनीनाथगडाची पालखी पंढरपूरला जाण्यासाठी प्रयत्न केला होता, मी विरोधी पक्ष नेता होतो. तत्कालीन सरकारने पालखीला परवानगी दिली नाही, असा आरोप त्यांनी आघाडी सरकारवर केला.
संत वामनभाऊ महाराज यांंच्यात प्रचंड शक्ती होती.
मध्यंतरी आपले सरकार नव्हते, आता पुन्हा सरकार आलेले आहे.पुर्वीचा मंजुर केलेला आराखडा व त्यातील अर्धवट कामे पुर्ण करु, असा शब्दच त्यांनी या पवित्र व्यासपीठावरून दिला अन् टाळ्यांचा गजर झाला.
कुकडीचे पाणी मराठवाड्याला आणले आहे. उर्वरीत पाणी
समुद्रात वाहुन जाणारे पाणी गोदावरी खो-यात पाणी आणु..
या कामासाठी संत वामनभाऊ महाराज यांनी आशीर्वाद द्यावेत, असा मीच आशीर्वाद वामनभाऊ यांंच्याजवळ मागतो…म्हणत हात जोडले.

प्रस्ताविक महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथकर यांनी केले. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, तिळगुळ घेऊन उर्जा घ्या, गुळातून गोडवा घ्यावा, गडाची सेवा करण्यासाठी ध्वज हाती घेतला आहे. गहिनीनाथ गडाचा सेवेकरी होईन. वाचासिद्धी असलेले संत वामनभाऊ महाराज होते; त्यांच्या आशीर्वादाची आपणास सर्वांना नितांत आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आ.बाळासाहेब आजबे,आ. सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे,….. यांच्यासह मोजक्या मान्यवरांची भाषणे झाली.

आ.लक्ष्मण पवार, मोनिकाताई राजळे,राजेंद्र म्हस्के, कुंडलीक खांडे, अजयदादा धोंडे,अक्षय मुदंडा,माजी आ.साहेबराव दरेकर, दादा ईदाते, विलास बडे,
डाॕ.नेहरकर उपस्थित होते. गडावर विविध जाती धर्म पंथांच्या राज्य आणि देशभरातून दिंड्या सहभागी झाल्या होत्या. संत वामनभाऊ महाराज की जय घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दर्शनासाठी प्रचंड रांगा होत्या. सुप्रसिद्ध गायक सुभाष शेप आणि बाल गायिका कु. सिद्धी चाटे यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम काल संपन्न झाला. आज दुपारी काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर प्रथे प्रमाणे पुष्पवृष्टी करण्यात आली. लाखोभक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद अत्यंत शिस्त आणि मनोभावे घेतला.

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर परमपूज्य वैकुंठवासी वामन भाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्याला लोकनेते गोपीनाथराव मुंडे उपस्थित राहायचे; त्यानंतर त्यांच्या कन्या मा.पंकजाताई मुंडे आणि खा.डॉ.प्रीतम ताई मुंडे या उपस्थित असायच्या; परंतु ही परंपरा पहिल्यांदा खंडित झाल्याने उपस्थितांमधून या अनुपस्थितीची जोरदार चर्चा दिसून आली.दरम्यान, नाराजी चा सूर ही दिसून आला. मुंडे घराण्यावरील भक्तांचे प्रेम लपून राहीले नाही.

सुभाष शेप आणि सिद्धी चाटे च्या भक्ती संगीताचा कार्यक्रम!

दोन दिवसीय पुण्यतिथी सोहळ्यात काल संध्याकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सुभाष शेप आणि बालगायिका कु.सिध्दी चाटे यांचा भाऊंच्या जीवनावरील भक्ती संगीताचा कार्यक्रम पार पडला. भजन,किर्तन,दर्शन, व वैभव महाप्रसादाने हा पुण्यतिथी सोहळा अधिक पवित्र झाला. यावेळी प्रा.बिभिषण चाटे,पत्रकार संजय सानप,अनिल गायकवाड,प्रा. सचिन पवार उपस्थित होते

साक्षात पंढरी अवतरल्याचा भास!

‘संत वामनभाऊ महाराज कि जय..!’ च्या घोषणाने परिसर अक्षरशः दणाणून गेला. लाखो भक्त भाऊंच्या चरणी नतमस्तक झाले, आजचा हा पुण्यतिथी सोहळा ‘न भूतो न भविष्यती’ असा पार पडला. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. साक्षात पंढरी अवतरल्याचा भास काही क्षण होत होता…


लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!