बीड

नाळवंडी सज्जाच्या कर्तव्यदक्ष तलाठी शितल चाटे यांना भूषण पुरस्कार जाहीर

पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुण्यात होणार वितरण

बीड, दि.24 )ः- कायम आपल्या कामामध्ये कर्तव्यदक्षपणा ठेवत शेतकर्‍यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी काम करणार्‍या नाळवंडी सज्जाच्या कर्तव्यदक्ष तलाठी शितल चाटे ग्लोबल स्कॉलसर्र् फाऊंडेशनकडून भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्या पुरस्कारचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरण होणार असल्याचे सांगितले आहे.
आपल्या कामात एकाग्रता ठेवून शेतकर्‍यांच्या सेवेत कायम राहत काम करणार्‍या नाळवंडी येथील तलाठी सज्जाच्या कर्तव्यदक्ष तलाठी म्हणून सर्वपरिचीत असलेल्या शितल चाटे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल पुणे येथील सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट आणि उल्लेखनिय कार्यचे तसेच दलालांकडून होणार्‍या दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे काम केल्याची दखल ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन यांनी घेतले आहे. शेतकर्‍यांबद्दल कणव असलेल्या तसेच शेतकर्‍यांच्या हितासाठी कायम काम करून त्या कामातून जनसेवेत भूषण प्राप्त केलेल्या तसेच शेतकर्‍यांच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य करत असल्याने चाटे मॅडम यांना पुण्याच्या संस्थेकडून पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भूषण पुरस्काराने शनिवार 26 नोव्हेंबर रोजी पुरस्काराचे वितरण होणार आहे. तरी शितल चाटे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!