देश विदेश राजकारण संपादकीय

मोदीग्रस्त भारत हाताची घडी तोंडावर मास्क , खादीच्या कापडावर प्रसिद्धीचे टास्क

khadi mask

कवी संपत सरल नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक वाक्य म्हणतात ” ओ झुठ भी ऐसा बोलते है जिसे सच शरमा जाये ” प्रतिमेच्या उदात्तीकरणाचा चरखा मन हि मन जोमात चालवताना आणि प्रसिद्धी आणि सिद्धीचे खादी सुत कातताना ते कुठेच कमी पडत नाही , जास्त वेळ घालत नाही थेट विषयाला हात घालू , एकाएकी ९५ मास्क कोरोनाला रोखू शकत नाही अशी टूल आली , कॉपी पेस्ट च्या जमान्यात अर्ध्या पत्रकारांनी तर ९५ मास्क थेट टकमक टोकावर नेऊन ठेवले , मात्र साधा प्रश्न विचारताना हे कुणाला का नाही वाटले कि एन ९५ चा मास्क काय आमच्या घरात मिळतो का , तो कामाचा नाही तर आजवर समजले नाही का , सरकारने जनतेचे पैसे खर्चून हे एन ९५ मास्क कितीचे घेतले मग त्यावर कुठला पर्याय ? आता खादी चे मास्क जे ९९९ रुपयात घेतले जातील त्या पाकीटावर मोदींचा चरखा कसा ? ज्यांच्या धडावर स्वतचे शीर आहे त्यांना या ठिकाणी वाव आहे , अवघा देश मुर्खात काढण्याची हिम्मत आणि जोखीम कुणी नियमित घेत असेल तर देशात राम राहिला नाही असेच म्हणावे लागेल .
आ. नरेंद्र दराडे यांच्या कुटुंबातील ९ सदस्य नाशिक मध्ये पॉझिटिव्ह येतात मात्र तेच मुंबईला पोहचल्यावर निगेटिव्ह येतात , त्यामुळे सोनूने कोरोणावर भरोसा का ठेवायचा असाच हा काल आहे , अमुक कारणाने होतोच असे नाही अन मोकळा वावर ठेवला तर कुठून येईल सांगता येत नाही , मृत्युदर सुमार असताना जग कोरोना एवढी धसकी कुठल्याच दुसऱ्या व्हायरसची घेत नाहीत , झाकली मुठ सवा लाखाची उघडली तर खाक ची प्रमाणे कोरोनाचे भय आता प्रस्थापित झाले आहे , जिथे आरोग्य यंत्रणा बुचकळ्यात आहेत तिथे सामान्य लोकांच्या तर्काची काय मजाल , कुठल्याही रोगाचा अन त्यातून होणाऱ्या मृत्यूचा असा एक ठरलेला प्रवास आणि ठरलेले स्तर असतात , मात्र कोरोनाचे नक्की असे काहीच नाही , संपर्कात आले तर होतोच असेही नाही ,कारण रुग्णाचे सोबती निगेटिव्ह येतात अन अमिताभ बच्चन सारखा सुरक्षेच्या वर्तुळात असताना देखील कोरोना नावाचा तक्षक त्याच्या शिसमहालात दाखल होतोच कसा ? कोरोना एक व्हायरस असेल ही मात्र कोरोना केविलवाणी चेष्टा आहे जी मानवाची केलीय , या कोरोना नावाच्या संसर्गात जीव वाचवण्यासाठी हात धुतले जात असले तर पैसे कमावण्यासाठी हात धुणारे कमी नाही , यासाठी कोरोना संकट नाही तर सुगीचा काळ देखील काहींना आहे , कोरोनात माल छापलेले कमी नसतील ज्याची नोंद पुढे इतिहासात येईलच कि . कोरोना च्या मयताच जसे पोस्टमार्टम होत नाही अन नेमके कशाने दगावले हे कारण त्या शरीरासोबत दफन दहन होते तसेच उलट तपासणी नसलेल्या काळात कोरोना एक संधी देखील असेल जी सोयीने सर्वच जन घेतील , आपण तोंडाला मास्क लावून फक्त एवढेच म्हणून कुणाचे काय अन कुणाचे काय ?
एन ९५ मास्क कोरोना रोखत नाही हे आत्ताच कसे समोर आले , कारण ९९९ रुपयाचा मास्क बाजारात आला , आपल्याला गृहीत तर धरले जात नाही ना याचा विचार सुजाण करतील . कोण म्हणत कोरोना फक्त व्हायरस आहे , कोरोना राजकारण आहे , कोरोना धंदा आहे , आणि कोरोना एक षड्यंत्र देखील , देशात १२ लाख ८७ हजार रुग्ण झाल्यावर आणि भीतीचे गडद सावट तयार झाले कीच हे मास्कचे ९९९ रु वाले इंजेक्शन कसे आले . कोरोनाग्रस्त म्हणून भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहेच मात्र देशातली महागाई , कोरोना विरोधात ताली थाळी नाद नंतर मेणबत्त्या शंख फुकून ( फेकून ) कोरोनाच्या विरोधात घंटा यश आम्ही मिळवले आहे . कारण आम्ही कोरोना ग्रस्त होण्या पूर्वी राजकीय परिघात मोदीग्रस्त आहोत .
हे आम्ही वाचले पाहिजे
जसेच एन ९५ मास्क ला सजा ये मौत सुनावण्याची तयारी केली त्याच वेळी मोदींचे तोंड दिसणारे मास्क जन्माला येण्याच्या प्रसूतकळा सुरु झाल्या अन पोस्ट देखील .
मुद्दा क्र (१ ) – भाजपाचे दिल्लीतील नेते व देशाचे वर्तमान आरोग्यमंत्री डॉ .हर्षवर्धन हे वल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनचे अध्यक्ष बनले..
मुद्दा क्र (२ ) – एन ९५ मास्कच्या विश्वासार्हतेवर डब्ल्यू एच ओ संघटना व देशातील काही तज्ञांनी आक्षेप घेतले आहेत, तज्ञांच्या मते हा मास्क कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी नाही, बाजारात या मास्कची किंमत साधारणतः रू. २०० ते रू.५०० पर्यंत आहे…
मुद्दा क्र (३ ) – लोकांनी एन ९५ मास्क वापरणे बंद केले त्यामुळे आठवडाभरापासुन एन ९५ मास्कचा खप पुर्णपणे कमी झाला आहे…
मुद्दा क्र (४ ) – काल परवाचं बाजारात देशाचे महामहिम पंतप्रधान मोदीजींचा फोटो असनारे खादी मास्क एका बड्या उद्योजकाने बाजारात आणले आहेत.. त्या मास्कची किंमत सुमारे रू. ९९९ आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!