संपादकीय

फेस टू चेंज स्पर्शाशिवाय जगण्याची ” हातोटी “

corona
corona

कोरोना अगदी पांचट विषय झाला हि असेल मात्र त्याचे परिणाम अंतिम बिंदू पर्यंत अद्याप पोहोचलेले नाहीत , कोरोना केवळ व्हायरस असता तर ठीक मात्र तब्बल पहिला वाढदिवस साजरा करण्याची वेळ आली तरी कोरोना अद्याप एक कोडे आहे . अश्यांना होतोच अन तश्यांना होऊच शकत नाही असे कोरोना बद्दल सांगता येत नसणे मानवाचा सर्वात मोठा पराभव आहे , म्हणजे अमिताभ बच्चनला होतच असेल मग इतरांना का होत नाही याचे उत्तर ना कोरोना देतो ना यंत्रणा , मंगळावर जाऊन प्लॉट विक्री करणारा मानव चक्क साबणाने हात धुवून जीवनाची रजीष्ट्री करत आहे , त्याचा फेर ओढला जाईल का नाही याची शासंकता माणसांना मास्क नावाचे मुंगसे घालण्यास मजबूर करत आहे , मरता क्या न करता हे जरी ठीक असले तरी कोरोना आज केवळ एक भीती म्हणून शत्रू क्रमांक एक ठरला आहे , कर्करोग वा अपघाताचे खाते सांभाळणारे यमदूत कोरोनाच्या खात्यावर जळत असावेत कारण कोरोनाच्या केवळ दहशतीने जे जग हादरले आहे ते कुठल्याच आपत्तीने गेल्या १०० वर्षात हतबल असावे ?
मानव जेव्हा अश्मयुगीन काळात रहायचा तेव्हा त्यास कपड्यापासून ते अन्ना पर्यंत सर्व काही नैसर्गिक होत मात्र पुढे बदल घडत घडत झाडाच्या पानांची जागा फैशन ने घेतली , भाषा आणि जगण्याचे अनेक बदल स्वीकारत आणि करत मानवाने आपल्या वर्तमान प्रगतीचा प्रवास साधला आहे , आलेल्या आपत्तीतून मानवाने आपले संचलन सुरक्षित आणि संतुलित केले आहे , कोरोना हे जसे संकट आहे तसेच कोरोना एका बदलाची नांदी आहे , हे बदल व्यवहारिक नसतील तर मानसिक सामाजिक अध्यात्मिक कौटुंबिक बदलांचे वारे याच कोरोनातून वाहते होणार आहेत . मास्क जो तोंडावर बांधताना आम्ही हसायचो आता ९० टक्के लोकांनी तोंडावर मुंगश्या सारखा लावला आहे , मानव पराधीन वैगेरे हे बोलणे टाळून आम्ही गुडघे टेकून अद्र्श्य कोरोनाच्या समोर त्राहीमाम करत आहोत . लस औषध येईपर्यंत जग कोरोनाच्या विळख्यात जाईल आणि तोवर अनेक खेळाडू पेव्हीलीयन मध्ये जाऊन बसलेले असतील , त्यामुळे लसीच्या बातम्यात भविष्य आणि आयुष्य शोधणाऱ्या लोकांनी वर्तमानात जगणे शिकले पाहिजे , तोंडावर मास्क लावूनच हातांना काम करायला लावावे अन त्या हातांना सैनीटायझर करून घ्यावं अशीच हि जगण्याची कथा असणार आहे , साबणाने हात धुवून हाताला हात रगडून कोरोनाच्या नावाने बोट मोडू शकता , अंगळ पंगळ उभा राहणाऱ्या लोकांनी देखील गर्दीत स्वतला एकट राखण्याचे कौशल्य शिकले पाहिजे , स्पर्श कुठेही करू पाहणाऱ्या हातांचे स्पर्श मोजून संशय धुवून टाकण्याची कला आम्हाला आत्मसात करावी लागणार आहे , कुठल्याच यंत्रणेकडे नक्की ठोक सूत्र नाही अगदी डब्ल्यू एच वाले देखील अंधारात गोळ्या फेकतात असेच काही निरक्षणे आहेत . हातात हात देण्याची कायमची ढब किमान जगण्यासाठी आम्हाला मोडावी लागणार आहे , गर्दी टाळून कोरोना टाळावा लागणार आहे , मरतो असे नाही मात्र जगुतच असे कुठला डॉक्टर सांगत नाही , सरकारला आपले अपयश झाकण्यासाठी जनतेत भीती असणे गरजेचे असते , अनादी काळापासून लोकांना नियंत्रित करण्यासाठी सत्ता कुठल्या तरी भीतीच्या आड दडत आल्या आहेत , यावेळी कोरोना हे जसे संकट आहे तसा तो सरकारला लाभलेला आडोसा देखील आहे , जेव्हा कोरोना हे संकट नसेल आणि घोटाळा असेल तेव्हा यावर सविस्तर लाईन क्रॉस करू , निसर्ग स्वतचा इलाज स्वत करत असतो त्यामुळे कोरोना आवरत येईल मात्र तेव्हा कुणी कसे हात धुतले यावर चर्चा करू मात्र चर्चा करायला जिवंत राहणे गरजेचे असते अन तीच लढाई आम्हाला लढायची आहे , काल तालुका गेवराईत एक पत्रकार नुसता घाबरून मेला , याचा अर्थ आमची लढण्याची शक्ती अगोदर मरत आहे , तिकडे इटलीत १०५ वर्षाची म्हातारी निगेटिव्ह होऊन कोरोनाला लोळवते आणि आमच्या गेवराईत केवळ कोरोनाच्या भीतीने जीव जात असेल तर आम्ही स्वतची कीव केली पाहिजे . केवळ स्पर्श टाळून व्यवहार करण्याची हातोटी जमली कि कोरोना गेला काय अन राहिला काय ? नाहीतरी जीवन आणि जगणे नीटनाटके होताना अनेक बदल स्वीकारत इथवर पोहचले आहेत .
डोक जाम झाले आहे , भौगोलिक व मानसिक रिंगणात आम्ही वर्तुळबंद झालो आहोत , स्वप्नांनी डोळे बंद करून घेतले आहेत , कुठलही नियोजन आयोजन प्रयोजन कल्पनेत देखील करता येत नाही , संपर्काचे मार्ग खुले असले तर माणसाच्या आयुष्यातली नाहक गर्दी कमी झाली आहे . जगणे अधिक संतुलित आणि सुरक्षित करण्याचे आव्हान मानव म्हणून आमच्या समोर आहे , डोक जाम झाले , काही करमेना , सुचेना , कधी जाणार हा कोरोना या पेक्षा या कोरोनात सर्व स्वप्न जगण्याची पद्धत आम्हाला शिकावी लागणार आहे , कोरोना म्हणजे काय या पेक्षा जगण्यासाठी काय काय याचा विचार आम्हाला करावा लागणार आहे . चेहरा लपवूनच जगण्याला सामोरे जावे लागणार आहे . हे हि दिवस जातील हे सांगणाऱ्या अमिताभ च्या कविता ऐकणे, हरकत नाही , मात्र न थांबता व्यवहार करावे लागणार आहे . ज्यांनी कायदे निर्माण केले त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर जर लॉकडाऊन पाळणार नाही असे म्हणणार असतील तर जगण्याची आणि जीवनाची अपरिहार्यता आम्ही समजून घेतली पाहिजे . जगण्यात आता मास्क , सैनीटायझर , साबण , हात धुणे , स्पर्श टाळणे हे आले आहे आणि जाणारच नाही हे जाणून त्याची सवय लावून आम्ही त्यात पारंगत झाले पाहिजे , बाकी प्रतिकार शक्ती वैगेरे साठी अनेक काढे आहेत कुठलाही ढोसा …….

error: Content is protected !!