करिअर संपादकीय

टक्क्यांची खैरात आकडे म्हणजे गुणवत्ता नाही रे बाळांनो

लहान असताना एक वाक्य नेहमी कानावर पडायचे तेव्हाची मैट्रिक म्हणजे आताची पंधरावी , तेव्हा चौथीला पावकी निमकी मुखपाठ असायची आता तर दहावीत गेले तरी ३० चा पाढा यायचा नाही , यातून शिक्षणाचा स्तर घसरला हेच सिद्ध व्हायचे . पास नापास अथवा गुण हे गुणवत्तेचे परीमापक नसतात त्यामुळे पुढे पास मागे नापास या नावाने कागदावरच्या गुणवत्तेचा जोवर कस लागत नाही तोवर कुणाच्या शैक्षणिक यशाला मान्यता मिळायची नाही . मागे थ्री इडियट नावाचा चित्रपट येऊन गेला , प्रमाणपत्रावर नाव नसलेला ( रांचो ) फुन्गसुक वान्ग्डू स्वतची ३०० पेटंट तयार करतो मात्र त्याच्याकडे गुणवत्तेचे प्रमाणपत्र नसत , अजब म्हणजे सर्वात हुशार असल्याचे प्रमाणपत्र असणारा सायलंसर चतुर रामलिंगम त्या रांचो यांच्या कंपनीत नौकर असतो . आता वरील समीकरण सर्व विध्यार्थ्यांना लागू पडत नाही मात्र यातले सूत्र मात्र लागू पडते , गुणवत्ता मार्कवरून सिद्ध होत नाही त्यामुळे भाच्ची पुतणी लेकीला १०० च्या आसपास मिळालेले टक्के गुणवत्तेचे प्रमाण मानणे घाईचे होईल , लेकरांच्या कष्टाचे कौतुक केलेच पाहिजे मात्र सुज आणि वास्तव गुणवत्ता यातला फुगवटा समजून घेतला तर बरे होईल , नाहीतर पाल्यांकडून पालकांच्या अवास्तव अपेक्षा आणि त्यातल्या तणावातून आम्हाला आत्महत्या पहाव्या लागतात , कल आणि गुणवत्ता सिद्ध व्हायला दहावी हा टप्पा असण्याचे काही कारण नाही बेस्ट फाईव्ह , प्रात्यक्षिक या नव्या मापदंडानी गुणवत्ता अधिक अलंकारिक भासत असली तरी त्याची चाचणी अद्याप व्हायची आहे याची जाणीव लेकरांना करून द्यावी लागणार आहे . अगदी ये तो शुरवात है म्हणत तुम्ही मुलांना पेढे भरवू शकता मात्र मानवी जीवनात नैतिक अधिष्ठान आणि व्यवसाय कौशल्य प्रमाणित होणे यास अवधी आहे हे समजून घेतले आणि सांगितले पाहिजे . सुजान नागरिक प्रत्येकाला बनवत व्यवस्थेला संपन्न आणि प्रगल्भ बनवणारे नेतृत्व घडवण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण प्रणाली . मात्र केवळ आभासी आणि गुणाचे फुगे संपन्न पिढी देऊन शकणार आहेत का ? लेकरांना उदासी पासून दूर काढताना मृगजळाच्या खोल दरीत तर आम्ही ढकलत नाहीत ना ? आता मला १०० टक्के पडले म्हणजे मी सर्वात पुढे सिद्ध झालो हि भावना म्हणजे त्या स्पर्धेतील सस्याची फसगत ठरू नये , कासवाचे सातत्य टिकवण्याचे लालित्य आमच्या मुलांना येण्यासाठी आम्हाला मुलांना तेवत गुणवत्तेचे पाईक बनवावे लागेल अन त्यासाठी असल्या कागदी घोड्यापासून वाचवावे लागेल , नाहीतर दहावीत चांगली मार्क घेणारी पुढे कसे ढ सिद्ध होतात याची उदाहरणे कमी नाहीत , मग आमच्या पोराला १० वीत एवढे होते आता कसे कमी , कोचिंग चा बाजार अन त्यात पूर्ण कुटुंबाची ससेहोलपट झालेली उदाहरणे कमी नाहीत . कौतुकाच्या सोहळ्यात वास्तवातली दाहकता कळावी रुचावी म्हणून वेगळे पडून लाईन क्रॉस करून हा विषय लिहला , लेकरानो आणि त्यांच्या बापांनो उदास होऊ नका , मात्र फसू आणि फसवू नका पोरांना सांगा मैदान अभी बाकी है , दहावी सिर्फ झाकी है , लेकरांचे चीमकुरे फोटो लाऊन कोचिंग वाले पोरांचे प्रलोभन भांडवल करतात .
हा लेख लिहताना प्रा सुशीला मोराळे यांची एक पोष्ट मी वाचली त्यांनी १०वीत ज्यांना ५० % च्या आत मार्क्स पडल त्यांनी घाबरू नका मला पण ४८ % होते मात्र बी.ए. व एम.ए.ला मी टॉपर होते त्यामुळे दहावीची कमी अधिक कुठलीच टक्केवारी गुणवत्तेचा परिचय समजणे घाईचे अन फसगतीचे ठरेल ज्ञान आकलन उपयोजन मूल्यमापन सराव शिक्षणाचे स्तर आहेत त्यात केवळ कागदावर ज्ञान वा शिक्षणाची सिद्धता होत नाहीच त्यामुळे टक्केवारीच्या फुगवट्यातून लेकर आणि लेकरांची गुणवत्ता नितळून घ्यावी करिता आजची लाईन क्रॉस

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!