Uncategorized

नगरपरिषद निवडणुकीत भाजपा ताकतीनिशी उतरणार, बीड शहर भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जाहीर केला निर्णय

बीड, लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि लोकप्रिय खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज आहे. आज राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याने राज्यातील जनतेमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला आहे. प्रस्तापितांच्या नगरपरिषदेतील भ्रष्ट आणि अनागोंदी कारभाराच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी बीड शहरातील नागरिक भारतीय जनता पार्टीचा सक्षम पर्याय म्हणून निवड करेल. कदाचित उद्या जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय झाला तर, बीडकरांसाठी हि मोठी संधी असेल. बीडकरांना थेट जनतेतून आपल्या पसंतीचा नगराध्यक्ष निवडून देता येईल.  नागरिकांना भ्रष्ट्राचार, भय मुक्त उत्तम प्रशासन देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक प्रयत्न राहील. अनुभवी कोअर कमिटीच्या माध्यमातून निकष लाऊन उमेदवारांची निवड केली जाईल. नगरपरिषद निवडणुकीत भाजपा  एकदिलाने ताकतीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. असे विचार भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी कार्यकर्ता बैठकीत मांडले.राज्य निवडणूक आयोगाने परवा नगरपरिषद निवडणुका घोषित केल्या. निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून बीड शहर भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ॲड.सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, स्वप्निल गलधर, सलीम जहांगीर, जगदीश गुरखुदे, भगीरथ बियाणी, प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. याबैठकीत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सूचना व मत जाणून घेण्यात आले. कोअर कमिटी मार्फत उमेदवारांची निवड व्हावी. मित्रपक्षांची युती झाल्यास भाजपा प्रभावित वार्ड सोडू नयेत. निष्ठावंत, सक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी. असे मत व्यक्त करण्यात आले. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस ॲड.सर्जेराव तांदळे यांनी मार्गदर्शन केले. बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला विजश्री खेचून आणण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.या बैठकीसाठी विक्रांत हजारी, अजय सवाई, सुभाष धस, ॲड.संगीता धसे, संग्राम बांगर, दीपक थोरात,कपिल सौदा,  विलास बामणे, अनिल चांदणे, शांतीनाथ डोरले, संभाजी सुर्वे, जालिंदर धांडे, कृष्णा तिडके, भूषण पवार, नागेश पवार, मनोज ठाणगे, किरण देशपांडे,पंकज धांडे, संतोष गवळी, बाबूलाल ढोरमारे, डॉ. जयश्री मुंडे, शैलजा मुसळे, छाया मिसाळ. शीतल राजपूत, लता बुंदेले, प्रीत कुकडेजा, संजीवनी राऊत, बाळासाहेब घुमरे, दत्ता परळकर, अमोल वडतिले, हरीश खाडे, राजेश चरखा, मुसा खान, नूर लाला, अम्मू शेख, अड्डू भाई, आदिल भाई, अफसर भाई, श्याम कोटुळे, महेश सावंत, बद्रीनाथ जटाळ,महम्मद गोलुभाई, अशोक थोरात, प्रसाद कुलकर्णी आदि सह कार्यकर्ते उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!