राजकारण

योगी आदित्यनाथां शिवाय एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण नाही!

30 July देशाच्या राजकारणात अयोध्येतील राम मंदिरावरून गेली अनेक वर्ष रंगलेला वाद संपून येत्या काही दिवसात राम मंदिर उभारण्यात येणार आहे.राममंदिराच्या भूमीपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी होणार आहे.या धार्मिक समारंभाकरीता कोण कोणत्या नेत्यांना,मुख्यमंत्र्यांना आंतरण मिळणार हि उत्सुकता सर्वांना लागलेली होती.या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. गरज पडल्यास या यादीत फेरबदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तयार केलेल्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगळता देशातील एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण नाही.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने शिवसैनिकांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि अयोध्या रामजन्मभूमीचं भावनिक नातं आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांनीही अयोध्या आणि शिवसेनेचे नातं पुढे टिकवून ठेवलं. मात्र तरी देखील उद्धव ठाकरे यांना राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं नाही. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं तर सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागेल. निवडक मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिल्यास वाद उद्भवू शकतो. आणि सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सर्व मुख्यमंत्र्यांना बोलवणे शक्य नाही. म्हणून केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!