महाराष्ट्र राजकारण

कोरोना सर्व्हे करणाऱ्या महिलेसोबत घडली संतापजनक घटना!

31 July :- कोरोना विषाणूच्या जगव्यापी संकटात आरोग्य विभागातील प्रत्येक व्यक्ती एका ईश्वरापेक्षा कमी नाही.कोरोनाच्या चपेटीतुन प्रत्येक रुग्णाचे प्राण वाचवण्याचे काम आरोग्य विभागातील डॉक्टरांसह प्रत्येक कर्मचारी करतो आहे.स्वतःच्या जीवची कसलीही तमा न बाळगता आरोग्य विभाग अहोरात्र झटत आहे.मात्र आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यासोबत गैर वर्तन करणाऱ्या समाजतील काही घटना माणुसकीस काळिमा फासणाऱ्या आहेत.मात्र असंच काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यात संतापजनक प्रकार घडला.

रत्नागिरी जिल्ह्यातील अड़खल जुईकर मोहल्ला येथे कोरोना सर्व्हेचे काम थांबवा म्हणत गावातील लोकांनी आरोग्य सेविका कर्मचाऱ्याला घेराव घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.गावातील 50 ते 60 लोकांनी घेराव घालत महिला कर्मचाऱ्याला दमदाटी करत गावातून हाकलून लावलं. जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले चिंतेचे विषय होत आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील साखरी नाटे येथे आरोग्य विभाग व पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्याची घटना ताजी असतानाच दापोली तालुक्यातील अड़खल गावात चक्क आयोग्यसेविकेला गावातील सर्वे करण्यास अटकाव करण्यात आला.

या महिला कर्मचाऱ्याच्या गाडीची चावी देखील हिसकून घेतली गेली. तसेच पुरुष मंडळीने दमदाटी केली.दरम्यान, याप्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल. कारण आरोग्य कर्मचाऱ्यांबाबतीत असे प्रकार वारंवार घडल्यास कामादरम्यान त्यांचं खच्चीकरण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!