Uncategorized

खा. प्रीतमताई पुन्हा जिल्ह्यात विणणार रस्त्यांचे जाळे ! 14 कोटींच्या रस्त्याचे आज ताईंच्या हस्ते उद्घाटन, आ. लक्ष्मण पवार यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांची राहणार उपस्थिती


गेवराई, दि. 15 (लोकाशा न्यूज) : डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला एक कणखर खासदार मिळालेला आहे, पहिल्या टर्म त्यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला देशाला जोडण्याचे मोठे काम केले, याच दरम्यान पंतप्रधान ग्रामसडक योजनेलाही त्यांनी गती दिली. अगदी राष्ट्रीय महामार्गांप्रमाणेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतील रस्त्यांचे जाळेही खा. प्रीतमताई जिल्ह्यात विणतील असा विश्‍वास सर्वांना आहे, याचाच एक भाग म्हणून आज दि. 16 एप्रिल रोजी त्यांच्या हस्ते गेवराईत 14 कोटींच्या रस्त्यांचे उद्घाटन होणार आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाला पुढे घेवून जाणारा आजचा हा क्षण ठरणार आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत 14 कोटी 39 लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्याचे उद्घाटन शनिवार दि.16 दु. चार वाजता खासदार डॉ. प्रितमताई मुंडे,यांच्या हस्ते व आमदार लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत होणार असून, या कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिंदेवाडी, नि. जवळका, तळवट बोरगाव, जळगाव मजरा येथील जवळपास 17 किमी. रस्त्याचे उद्घाटन शनिवार दि.16 रोजी धानोरा ता. गेवराई येथे दुपारी चार वाजता खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते व आमदार लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदरील काम राजकमल कन्स्ट्रक्शन करणार आहे. आजचा हा क्षण बीड जिल्ह्याला विकासात पुढे घेवून जाणारा ठरणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!