Uncategorized

कर नाही तर डर कशाला,खोटे गुन्हे दाखल केल्यास सहन केले जाणार नाहीत-डॉ. योगेश क्षीरसागर

जागेच्या रजिस्ट्री वरून घडलेली घटना आणि दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे याच्याशी आमचा संबंध नाही आम्ही मालक नसताना किंवा उपस्थित नसताना जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही निषेध करतो घटनेशी संबंध नसताना नाव लावण्यात आले असून ज्यांनी गुन्हे दाखल केले ते सध्या कुठे आहेत असा सवाल करत कर नाही तर डर कशाला यापुढे खोटे गुन्हे दाखल केल्यास सहन करणार नाही असे माजी नगरसेवक डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी ठणकावून सांगितले आहे

आज के एस के महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या संपर्क कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर योगेश शिरसागर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप सचिन मुळूक डॉक्टर सारिका क्षीरसागर विनोद मुळूक विलास विधाते रवींद्र कदम गणेश वाघमारे विकास जोगदंड प्रभाकर पोकळे महेश धांडे आदी उपस्थित होते

पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर योगेश क्षीरसागर म्हणाले की दिनांक 25 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या रजिस्ट्री कार्यालयात जी घटना घडली त्या घटनेत माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आणि मी आमची दोघांची नावे जाणीपूर्वक टाकण्यात आली आहे खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे वास्तविक पाहता ही जागा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मालकीची आहे ती पवार कुटुंबीयांनी घेतलेली आहे न्यायालयाच्या निकालानंतरच या जागेचा व्यवहार केला गेला आहे हा व्यवहार दोन कुटुंबातील असताना ज्यांचा या व्यवहाराशी संबंध नाही ते लोक त्याठिकाणी आले कशासाठी होते ज्या जागेचा व्यवहार होणार होता ती जागा अधिकृतपणे अण्णांच्या नावावर आहे असे असताना या ठिकाणी येऊन गोंधळ घालने मारहाण करणे आणि दबावतंत्राचा वापर करणे हे कितपत योग्य आहे िल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या हा गोंधळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेला आहे मात्र या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीची हर्डीक्स गायब तर झाली नाही ना? पोलिसांची तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहे ज्या दिवशी हा व्यवहार होता त्यादिवशी मी स्वतः मुंबईत होतो तर भारतभूषण क्षीरसागर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच आराम करत होती असे असताना आमची दोघांची नावे जाणीवपूर्वक घेण्यात आली आहे येत्या काही महिन्यात नगरपालिका निवडणुका होणार आहेत आम्हाला जाणीवपूर्वक अडकवण्याचे कारस्थान यानिमित्ताने करण्यात आले आहे खोट्या तक्रारी आणि खोटी माहिती पसरवून बदनाम करण्याचा प्रयत्न करणे ही दुसरी वेळ आहे खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी आमच्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे आम्ही शांत बसलो आहोत दाखल करण्यात आलेले गुन्हे केवळ राजकीय हेतूनेच असल्याचे आता सिद्ध झाले आहे आमच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा फिर्यादीने फिर्याद दिली आहे तो फिर्यादीत आरोपी असून त्याच्यावर ठाणे गुन्हे दाखल आहेत स्वर्गीय काकूंचे वारसदार म्हणून अशी घटना घडणे अपेक्षित नव्हते आम्हीपण वारसदार आहोत दोन वारसदारांनी मधील फरक जनतेने ओळखायला हवा ज्यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले ते सध्या कुठे आहेत? असा सवाल करत कर नाही तर डर कशाला असे म्हणून डॉ योगेश शिरसागर यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांचा भांडाफोड जेव्हा आमच्यावर बीडच्या जनतेचे प्रेम आहे आणि येत्या निवडणुकीत त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला असल्याचे डॉक्टर योगेश शिरसागर यांनी सांगितले

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!