Uncategorized

सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात खा.प्रितमताई शेतकऱ्यांसोबत थेट पोहचल्या महावितरणच्या कार्यालयात, महावितरणने सक्ती न करता शेतकऱ्यांच्या सहकार्याने बिलाचा भरणा करून घ्यावा: खा. मुंडे

बीड । दि. २३ ।
वीज वितरण विभागाकडून सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांतून शेतकऱ्यांच्या वसुली विरोधात तक्रारी प्राप्त झाल्याने खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी बीड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली.जिल्ह्यात कृषी पंपाच्या देयकांची सुरू असलेली वसुली सक्तीची न करता शेतकऱ्यांच्या परिस्थितीनुसार भरणा करून घ्यावा व शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या.

मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेचा सामना करत आहे,शेतकरी संकटात असताना कृषी पंपाची वीज खंडित करणे अन्यायकारक आहे.रब्बीच्या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना काही भागांमध्ये कमी दाबाचा वीज पुरवठा होतो आहे,तर काही ठिकाणी थकीत देयकांच्या वसुलीसाठी संपूर्ण वीज खंडित केली जाते आहे.महावितरण विभागाने सक्ती न करता शेतकऱ्यांच्या सहकार्याने,त्यांच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार भरणा करून घ्यावा असे खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या.

एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा घेतल्या जाणून

राज्यात सुरू असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर खा.प्रितमताई मुंडे यांनी बीड आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.प्रतिकूल परिस्थितीत सर्वसामान्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या त्यागाची राज्य सरकार गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्यांना न्याय द्यावा,एसटी कर्मचाऱ्यांच्या या लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास त्यांनी संपकऱ्याना दिला.यावेळी खा.प्रितमताईंनी थेट एसटीमध्ये जाऊन पाहणी केली आणि दैनंदिन वाहतुकीत कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

•••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!