बीड

करुणा शर्मा यांच्या निवस्थानाची चौकशीसाठी बीड पोलिसांचे पथक मुंबईत दाखल

करुणा शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बीड पोलिसांचं एक पथक करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झालं आहे. सकाळी हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीनं पुढील तपास करण्यात येत आहे. बीड पोलिसांकडून करुणा शर्मा यांच्या घरात सर्च ऑपरेशन केलं जात आहे.
दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल आढळल्यानंतर त्यांच्या गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर करुणा शर्मा यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या त्यांना बीड जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आज बीड पोलिसांचं एक पथक मुंबईत दाखल झालं आहे. करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी बीड पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. तपासणी अंती काय होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!