धारूर

स्मार्ट आवरगावचा पुन्हा डंका, गाव पाहूण सीईओ भारावले, आवरगाव महाराष्ट्रासाठी आदर्श ग्राम ठरणार – अजित पवार


धारूर : जिल्ह्यात स्मार्ट ठरलेल्या आवरगावचा पुन्हा सर्वत्र डंका पहायला मिळत आहे. गुरूवारी सायंकाळी सीईओ अजित पवार आणि ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी धारूर तालुक्यातील आवरगाव या स्मार्ट ग्रामलाही भेट दिली. साधारणत: दोन तास ते आवरगावमध्ये होते. यावेळी त्यांनी चांगलं काम करणार्‍या आवरगावच्या सरपंच पद्मीनीबाई जगताप, युवा नेते अमोल जगताप, ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे, अंगणवाडीताई निता नखाते, आशाताई अंजली नखाते यांचे भरभरून कौतूक करत त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी सीईओंनी संपूर्ण गावाची पाहणी केली, गावातील नियोजन पाहूण यावेळी ते आक्षरक्ष: भारावरूनच गेले. ज्या प्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे अगदी त्याचप्रमाणे आवरगावही वाटचाल करत आहे, त्यामुळे भविष्यात आवरगाव महाराष्ट्रासाठी नक्कीच आदर्श ठरेल, असा विश्‍वासही यावेळी सीईओ अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. याबरोबरच यापुढे गावाला ज्या ज्या वेळी मदत लागेल त्या त्यावेळी आम्ही तात्काळ मदत करू, गावाला मिळालेला पुरस्कार आणि त्या पुरस्काराची रक्कमही तात्काळ मिळवून देवू , असे आश्‍वासन यावेळी सीईओंनी ग्रामस्थांना दिले आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक सर्जेराव जगताप, डिंगाबर नखाते, अजित जगताप, लालासाहेब जगताप, बालासाहेब नखाते, कुलदीप जगताप, पुष्पराज जगताप, महादेव जगताप, राहूल नखाते, राहूल जगताप, महेश नखाते, मनोज नखाते, विनोद नखाते, बळवंत नखाते, सुरेंद्र नखाते,उत्तम लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!