माजलगाव

दोन दुचाकीचा अपघात; दोन ठार रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील घटना

Harish YadavAttachments19:33 (2 minutes ago)
to me

-माजलगाव, ता. २७ (लोकाशा न्यूज) : पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने समोरील दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले. ही घटना शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंपासमोर घडली. अरुण जगन्नाथ शेजूळ (वय ६५ वर्ष, रा. आबेगाव), नंदकुमार संतराम महिपाल (वय ३८, रा. शिंदेवाडी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी कि, अरुण शेजूळ हे माजलगावहून खामगाव पंढरपूर महामार्गावरून स्कूटीवरून शेतात जात होते. रिलायन्स पंपाच्या बाजूला असलेल्या शेतात जाताना त्यांनी अचानक स्कुटी वळविली असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या नंदकुमार महिपाल यांच्या युनिकॉर्न दुचाकीची धडक बसली. पाठीमागून येणारी दुचाकी वेगात असल्याने मोठा अपघात होऊन दुचाकीवरील दोघेही सिमेंट रस्ता असलेल्या महामार्गावर पडले. यामुळे दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दोघांनाही माजलगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. ————————अरुण शेजूळ सेवानिवृत्त अभियंता —————————दोन दुचाकीच्या अपघातात ठार झालेले अरुण शेजूळ हे जलसंपदा विभागात अभियंता होते. दोन वर्षापासून ते निवृत्त झाल्याने शेती व्यवसायात रमले होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!