बीड

रॅगिंगचा त्रास झालेल्या बीडच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची ना. अमित देशमुखांनी चौकशी लावली


बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : नाशिकच्या वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या बीडच्या स्वप्नील शिंदे या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. स्वप्नील शिंदे याची अनेक दिवसांपासून रॅगिंग होत होती. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकरणात मंत्री अमित देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
स्वप्नील महारुद्र शिंदे हा कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून 2018 ला एमबीबीएस झाला. अत्यंत हुशार असलेल्या स्वप्नीलनं चक्क गोल्ड मेडल मिळवलं. आपल्या पदव्युत्तर शिक्षणासाठीही स्वप्नीलला, सरकारी कोट्यातून मेरिटवर अ‍ॅडमिशन मिळाली होती. आपल्या अभ्यासू गुणांनी स्वप्नील हा विद्यार्थ्यांत लोकप्रिय होता. मात्र त्याच्या याच हुषारीचा काहींना अतोनात राग होता. नाशिकला तेच झालं आणि त्याच्या सिनिअर असलेल्या दोन विद्यार्थिनींनी त्याचा छळ सुरू केल्याचा आरोप त्याचे वडील महारुद्र शिंदे यांनी केला आहे. यातुनच बुधवारी सकाळी स्वप्नीलचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. स्वप्नील बाथरुममध्ये पडला आणि त्यात त्याचा मृत्यु झाला असे रुग्णालय प्रशासन सांगत असले तरी स्वप्नीलने छळाला कंटाळून आत्महत्या केली असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!