बीड

सलीम जहाँगीर यांच्या पाठपुराव्यामुळे रेशन दुकाने आजपासून उघडण्याचे आदेश

बीड ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने गेल्या एक महिन्यापासून बंद होती. दुकानदारांचा संप आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने धान्य वाटप रखडले होते. यासंदर्भात भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा करून संप मिटवण्यासाठी आणि दुकाने सुरू व्हावेत म्हणून प्रयत्न केले. अखेर सलीम जहाँगीर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आज दि.21 मे पासून जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने उघडण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.

बीडसह राज्यातील रेशन दुकानदारांनी आपल्या मागण्यांसाठी दि.1 मे पासून संप पुकारला होता. यासंदर्भात ईद आणि अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर संप मिटवून धान्य वाटपाचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे केली होते. जिल्हाधिकारी यांनाही यासंदर्भात निवेदन दिले होते. राज्यस्तरावर संप मिटला मात्र जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे रेशन दुकाने बंद होती. त्यामुळे गोरगरिबांना धान्य मिळाले नाही. यासंदर्भात सलीम जहाँगीर यांनी पुन्हा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप , जिल्हा पुरवठा अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाच्या सूचनानुसार रेशन दुकाने पूर्ण वेळ उघडी ठेवण्याचे आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून धान्य वाटपाच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली होती. अखेर सलीम जहाँगीर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आज दि.21 मे पासून सर्व रेशन दुकाने सकाळी 7 ते 11 यावेळेत उघडी ठेवून धान्य वाटपाचे आदेश द्यावेत असे पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी सर्व तहसिलदारांना दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम ( एनएफएसए ) अंतर्गत केंद्र सरकारने गरीब कुटुंबांना प्रति व्यक्ती एक ते तीन रुपयांच्या दराने 5 किलो अन्नधान्य. याव्यतिरिक्त , प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ( पीएमजीकेवाय ) दोन महिन्यांसाठी ( मे आणि जून ) त्याच लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य विनामूल्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार नागरिकांनी आपल्या रेशन दुकानदारांकडून धान्य प्राप्त करून घ्यावे असे आवाहन भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!