बीड

गळफास घेऊन कोरोनाबधित रुग्णाची आत्महत्या, बीडच्या दिप हॉस्पिटल मधील घटना

बीड, दि. 21 : गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्या केली . ही खळबळजनक घटना बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी ( दि .२१ ) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली . या घटनेने खळबळ उडाली असून घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली आहे . रामलिंग महादेव सानप ( वय ३५ रा . तांदळ्याचिवाडी ता.बीड ) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे . घटनास्थळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी धाव घेत घटनेची घेतली . या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली . आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहे . दरम्यान तणावातून या रुग्णाने आत्महत्या केली असावी असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!