माजलगाव

लहान भावाने केला मोठ्या भावाचा भोकसून खून, प्रॉपर्टीच्या वादातून घड़ली घटना


माजलगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पातरुड येथे लहान भावाने मोठ्या भावाचा भोकसून खून केल्याची घटना सोमवार सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली यात मोठा भाऊ हा जागीच ठार झाल्याने परिसरात एकाच खळबळ माजली होती. प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाला असल्याची चर्चा परिसरात होती.
पातरुड येथे मुख्य रस्ता असलेल्या माजलगाव तेलगाव रोडवर शेख ईर्षाद शेख शकील वय 30 वर्ष व त्याचा लहान भाऊ शेख अर्शद शेख शकील वय 25 यांचा मोबाईल शॉपीचा व्यवसाय आहे. या दोघा भावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद होता व या वादातूनच सोमवार दिनांक 8 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कडाक्याचे भांडण झाले यातूनच लहान भावाने मोठा भाऊ असलेल्या शेख इर्शाद याला चाकूने भोसकले यात गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. ही मारामारी सुरू असताना एकच धावपळ होऊन ऐन मुख्य रस्त्यावरच परिस्थिती अत्यंत खळबळजनक झाली होती. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!